advertisement
होम / फोटोगॅलरी / कोरोना / खरं की खोटं? Covaxin साठी गाईच्या सीरमचा वापर?

खरं की खोटं? Covaxin साठी गाईच्या सीरमचा वापर?

कोवॅक्सिन लशीत गायीच्या वासरातील सीरमचा (Cow calf serum in covaxin) वापर करण्यात आला, हे खरं आहे की खोटं?

01
कोवॅक्सिन (Covaxin) लस तयार करताना वापरलेल्या घटकाबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोवॅक्सिन लशीमध्ये गाईचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

02
गायीच्या नवजात वासराच्या रक्तामधील अंश म्हणजे सीरम वापरलं कोवॅक्सिन लस तयार करण्यासाठी वापरण्यात आलं, अशी माहिती आरटीआयअंतर्गत मिळाल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला. 

03
खरंच भारतात तयार करण्यात आलेल्या कोवॅक्सिन लशीमध्ये गायीचा वापर करण्यात आला का? याबाबत केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे.

04
नवजात वासराच्या रक्तातील अंश केवळ व्हेरो पेशी तयार करण्यासाठी किंवा वाढीसाठी वापरला जातो. विविध प्रकारचे बोवाइन आणि अन्य प्राण्यांमधील रक्ताचे अंश हे व्हेरो पेशींच्या वाढीसाठी मानक संवर्धक घटक मानले जातात.

05
व्हेरो पेशींचा उपयोग पेशींचं जीवन स्थिरावण्यासाठी केला जातो, ज्याची लस तयार करण्यात मदत होत असते. हे तंत्रज्ञान दशकांपासून पोलिओ, रेबीज आणि एन्फ्लुएन्झा लशींमध्ये वापरण्यात आलं आहे.

06
नवजात वासराच्या रक्तातील अंश व्हेरो पेशींमध्ये वापरल्यानंतर तो त्यातून काढून टाकण्यासाठी व्हेरो पेशींच्या वाढीनंतर त्या पेशी पाण्याने, रसायनांचा वापर करून धुतल्या जातात (त्यांना तांत्रिकदृष्ट्या बफर म्हणूनही ओळखले जाते).

07
त्यानंतर विषाणू वाढीसाठी या व्हेरो पेशींना कोरोना विषाणूची लागण केली जाते. विषाणू वाढीच्या प्रक्रियेमध्ये व्हेरो पेशी पूर्णतः नष्ट केल्या जातात. त्यानंतर हा वाढलेला विषाणू नष्ट (निष्क्रिय) केला जातो आणि त्याचे शुद्धीकरण देखील केले जातं.

08
निष्क्रिय केलेला विषाणू अंतिम लस तयार करण्यासाठी वापरला जातो आणि लशीच्या अंतिम घडणीत वासराच्या द्रवाचा वापर केला जात नाही.

09
अंतिम लशीमध्ये (कोवॅक्सिन) नवजात वासराच्या रक्तातीलअंश (सीरम) मुळीच नसतो आणि वासराच्या रक्तातील अंश हा लशीच्या अंतिम उत्पादनाचा घटकही नसतो.

10
त्यामुळे कोवॅक्सिनबाबदत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे आणि दिशाभूल करण्यात आली आहे, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • कोवॅक्सिन (Covaxin) लस तयार करताना वापरलेल्या घटकाबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोवॅक्सिन लशीमध्ये गाईचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement