प्यायलाय का कधी 'पांढरा चहा'? फायदे ऐकून व्हाल थक्क

प्यायलाय का कधी 'पांढरा चहा'? फायदे ऐकून व्हाल थक्क

तुम्हीदेखील ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमनटी यांची चव चाखली असेल; पण तुम्ही कधी पांढर्‍या चहाची म्हणजे व्हाइट टीची (White Tea) चव चाखली आहे का?

  • Share this:

मुंबई, 16 जून- चहा (Tea) म्हणजे पृथ्वीवरचं अमृत असं म्हटलं जातं. बहुतांश लोकांची सकाळ ही चहानेच सुरू होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत चहाचा आपण घरी जो पितो तो एकच प्रकार सर्वांना माहित होता. आता मात्र चहाचे ग्रीन टी, हर्बल टी, ब्लॅक टी असे अनेक प्रकार आले आहेत. तुम्हीदेखील ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमनटी यांची चव चाखली असेल; पण तुम्ही कधी पांढर्‍या चहाची म्हणजे व्हाइट टीची (White Tea) चव चाखली आहे का?  नसेल तर जाणून घ्या या व्हाईट टीबद्दल आणि त्याच्या आरोग्यादायी फायद्यांबद्दल.

काय आहे पांढरा चहा :

पांढरा चहा अर्थात व्हाइट टी कॅमेलिया (Camellia) नावाच्या एका वनस्पतीच्या पानांपासून बनविली जाते. या झाडाच्या पांढर्‍या पानांपासून हा चहा तयार केला जातो. नवीन पाने आणि त्याच्या सभोवतालच्या पांढर्‍या तंतुपासून हा चहा तयार होतो. या चहाला अतिशय हलका तपकिरी किंवा पांढरा रंग असतो, त्यामुळं त्याला पांढरा चहा म्हणतात. त्यात टॅनिन, फ्लोराईड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात. व्हाईट टीमध्ये ग्रीन टीपेक्षा बर्‍याच कमी प्रमाणात कॅफिन (Coffin) असतं. हा चहा आरोग्यासाठी लाभदायी आहे.

(हे वाचा:फक्त स्टेरॉइड्स नाही तर काढ्यामुळेही फंगल इन्फेक्शनचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध   )

सूज कमी करण्यास उपयुक्त :

या व्हाइट टीमुळे दाह, सूज कमी होण्यास मदत होते. या चहात पॉलिफेनॉल्सचंप्रमाण अधिक असतं, जे अँटी-ऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात. त्यामुळं शरीराचं ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून रक्षण होतं आणि सूज कमी होण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त :

(हे वाचा: कोरोनामुळे बाळाला दूध पाजणं थांबवू नका; Corona positive मातांसाठी गाइडलाइन्स  )

व्हाइट टी मधुमेह (Diabetes) नियंत्रित करण्यात अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं आढळून आलं आहे. यात असणारे अँटिऑक्सिडेंट (Antioxidant) गुणधर्म इन्शुलिन निर्मितीला होणारे अडथळे दूर करण्यात मदत करतात. या चहात असलेले नैसर्गिक गुणधर्म रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी ठेवतात. तसेच, स्नायूंमध्येदेखील ग्लूकोजची पातळी वाढू देत नाहीत. ज्या लोकांनां उच्च मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी या चहाचं सेवन करणे लाभदायी आहे. मात्र ज्या लोकांची साखर कमी होते म्हणजेच ज्यांना हायपोग्लायसोमियाचा त्रास आहे त्यांनी हा चहा पिऊ नये.

त्वचेसाठीही गुणकारी :

व्हाइट टी त्वचेसाठीदेखील (Skin) लाभदायी आहे. यात अँटी-एजिंग आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळं त्वचा घट्ट आणि चमकदार राहण्यास मदत होते.वयानुसार त्वचेवर निर्माण होणाऱ्या सुरकुत्याही पडत नाहीत.

Published by: Aiman Desai
First published: June 16, 2021, 5:26 PM IST

ताज्या बातम्या