नवी दिल्ली, 19 जुलै : प्रत्येकालाच वाटतं की आपली त्वचा सुंदर आणि प्रॉब्लेम फ्री (Problem Free) असावी. याकरता बरेच उपचार आपण करत असतो. ब्युटी प्रोडक्स, स्किन ट्रिटमेन्ट किंवा होम रेमेडीज (Home Remedies) तर, आपण तयार वापरतच असतो. कधी कधी त्याचे साईड इफेक्ट (Side Effect) झाल्याने आपला चेहऱ्याला उलटे परिणाम भोगावे लागतात मात्र, कोणत्याही साईड इफेक्टशिवाय त्वचा विकार बरे करायचे असतील तर, अर्गन ऑईलचा वापर करू शकतो.
स्कीन प्रॉडक्ट आणि कॉस्मेटिक्समध्ये अर्गन ऑईल हा महत्त्वाचा घटक पदार्थ असतो. आजकाल बाजारामध्ये ऑलिव्ह ऑईल,आव्होकाडो ऑईल आणि जोजोबा ऑईल यासारखे अनेक तेल मिळतात. या तेलांप्रमाणे अर्गन ऑईल सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे ऑईल अतिशय हलकं असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन ई (Vitamin E) आणि फॅटी ऍसिड असतं. यामुळे त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात. जाणून घेऊयात अर्गन ऑईलचे फायदे.
(पावसाळ्यात साखर, मीठामध्ये ओलावा तयार होण्याचं No Tension! फॉलो करा या टिप्स)
अर्गन ऑईलमध्ये ऍन्टीऑक्सिडंन्ट असतं. ज्यामुळे सनबर्न किंवा स्क्रीन डॅमेज बर होतं.
यामधील बरेचसे घटक नुकसान उन्हामुळे चेहरा काळवंडणं किंवा त्वचेचं झालेलं नुकसान बरं करू शकतात.
अर्गन ऑईल ऍन्टी एजिंगप्रमाणे काम करतं.
यामुळे त्वचेमध्ये इलास्टिसिटी वाढते आणि त्यामुळे त्वचा मुलायम बनते.
('वर्क फ्रॉम होम’ मुळे वाढली पाठदुखी; 'हे' छोटे बदल देतील आराम)
त्याच्या नियमित वापरामुळे एक्सफोलिएशमुळे मृत त्वचा निघून जाते.
अर्गन ऑईल त्वचेसाठी बेस्ट मॉश्चरायझरचं काम करते. यामुळे स्किन हायड्रेट राहते.
यातील विटामिन ई आणि फॅटी ऍसिड त्वचेला नैसर्गिकरित्या तजेलदार बनवतात. यामुळे ड्राय स्किनचा त्रास कमी होतो.
(पावसाळ्यात वाढतोय विविध आजारांचा धोका; या Tips वापरून लहान मुलांना ठेवा सुरक्षित)
स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी देखील अर्गन ऑईल वापरता येऊ शकतं.
अर्गन ऑईलमध्ये ऍन्टीबॅक्टरियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे त्वचेची जळजळ, खाज, रॅशसे असे त्रास कमी होतात.
अर्गन ऑईल सीबम प्रोडक्शन थांबवतं यामुळे ऑयली त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स कमी येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.