• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पावसाळ्यात वाढतोय विविध आजारांचा धोका; या सोप्या Tips वापरून लहान मुलांना ठेवा सुरक्षित

पावसाळ्यात वाढतोय विविध आजारांचा धोका; या सोप्या Tips वापरून लहान मुलांना ठेवा सुरक्षित

तज्ज्ञांच्यामते या काळात आपल्या मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. डोळे अतिशय नाजूक अवयव आहे. भविष्यातल्या नुकसानाचा विचार करता मुलांच्या डोळ्याची काळजी आजपासूनच घ्यायला हवी.

तज्ज्ञांच्यामते या काळात आपल्या मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. डोळे अतिशय नाजूक अवयव आहे. भविष्यातल्या नुकसानाचा विचार करता मुलांच्या डोळ्याची काळजी आजपासूनच घ्यायला हवी.

लहान मुलांचं पावसाळ्यामध्ये (Monsoon) आजारी पडणं पालकांची काळजी वाढवतं.सध्या कोरोना (Corona) काळात तर,मुंलांना रुग्णालयात न्यायलाही भीती वाटते. त्यामुळे आजारपण टाळण्यासाठी काही हेल्थ टिप्स (Health Tips) वापरा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै : पावसाळा (Monsoon) आणि आजारपण हे समीकरण ठरलेलं असतं. या काळामध्ये मच्छर (Mosquito) चावल्यामुळे मलेरिया,डेंग्यू, चिकनगुनिया झिका व्हायरस (Virus) सारख्या आजारांचा धोका वाढलेला असतो. याशिवाय तापमानात सतत बदल (Temperature Change) होत असल्यामुळे सर्दी,खोकला, ताप हे त्रास लहान मुलांना होतात. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलं आजारी पडणार नाही याची जास्त खबरदारी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्यात मुलांना आजारपणापासून वाढवणं कठीण असलं तरी काही सोप्या टिप्स (Easy Tips) वापरुन तुम्ही मुलांना इन्फेक्शनपासून दूर ठेवू शकता. सुती कपडे वापरा आपण उन्हाळ्यात गर्मीपासून वाचण्यासाठी मुलांना सुती कपडे घालतो. पण, पावसाळ्यातही मुलांच्या कपड्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या काळामध्ये अचानक पाऊस पडल्यामुळे थंड वातावरण निर्माण होतं तर, पाऊस थांबल्यानंतर गरम होऊ लागतं. या तापमान बदलाचा मुलांवर वाईट परिणाम होतो. शिवाय पावसाळ्यामध्ये मच्छर वाढलेले असतात. त्यामुळे मच्छर चावल्यानंतर होणारे आजारही होऊ शकतात. या करता मुलांच्या कपड्यांची विशेष काळजी घ्या पावसाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे वापरावेत.

  कोरियन महिलांप्रमाणे रात्री त्वचेसाठी करा हे उपाय; ओळखू येणार नाही तुमचंही वय

  मच्छरांचा त्रास या काळात मच्छरांची वाढ इतर दोन ऋतूंपेक्षा जास्त होते. पावसाचं पाणी एखाद्या ठिकाणी साठल्यामुळे मच्छरांची पैदास होते. त्यामुळे लहान बाळांना अंग झाकणारे पूर्ण कपडे घाला. याशिवाय मुलांना झोपवताना मच्छरदानी मध्येच झोपवा. रोज आंघोळ घाला पावसामुळे गारठा निर्माण झाला तरी लहान मुंलांना अंघोळ घालणं टाळू नका. कोमट पाण्याने त्यांना आंघोळ घालण्याआधी तेलाने मॉलिश करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. अंग स्वच्छ राहिल्यामुळे त्वचेचे विकार होणार नाहीत.
  Published by:News18 Desk
  First published: