Home /News /lifestyle /

केस गळतीचे कारण तुमची हेयर वॉशची चुकीची पद्धत तर नाही ना? हे आहेत उपाय

केस गळतीचे कारण तुमची हेयर वॉशची चुकीची पद्धत तर नाही ना? हे आहेत उपाय

स्कॅल्पमध्ये घाण साचल्यामुळे केस अधिक तुटतात आणि नवीन केसांची वाढही थांबते. म्हणूनच महागडे शाम्पू, तेल आणि हेअर सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही अनेकांचे केस वाढत नाहीत.

    नवी दिल्ली, 24 जून : आपले केस जास्त गळत असतील तर याचे एक कारण चुकीच्या पद्धतीने केस धुणे हे असू शकते. स्कॅल्प (डोक्याची त्वचा) व्यवस्थित साफ न केल्यास केसांच्या मुळांमध्ये घाण साचू शकते, जे केस गळण्याचे प्रमुख कारण असू शकते. स्कॅल्पमध्ये घाण साचल्यामुळे केस अधिक तुटतात आणि नवीन केसांची वाढही थांबते. म्हणूनच महागडे शाम्पू, तेल आणि हेअर सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही अनेकांचे केस वाढत नाहीत. केसांची चांगली काळजी घेऊनही अनेकदा केस गळणे कमी होत नाही. निरोगी केसांसाठी तुम्ही सकस आहारही घ्यावा जेणेकरून केसांना आतून पोषण आणि ताकद मिळू शकेल. केस धुण्याची योग्य पद्धत जाणून घेतल्यास केसगळती कमी (Make your hairs strong) होऊ शकते. केस धुण्याचा योग्य मार्ग - शॅम्पू करण्यापूर्वी 1 किंवा 2 तास आधी कोमट तेलाने मालिश करा. तेलाने मसाज केल्यानंतर केसांना वाफ (स्टीम) देऊ शकता, जेणेकरून तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचू शकेल. वाफ देण्यासाठी आपण स्ट्रीमर किंवा गरम पाण्यात ओला केलेला टॉवेल देखील वापरू शकता. यानंतर तुम्हाला केस चांगले ओले करावे लागतील. केस व्यवस्थित ओले केल्यानंतर, तुम्हाला योग्य शाम्पूने स्कॅल्पला मसाज करावे लागेल आणि स्कॅल्प व्यवस्थित स्वच्छ होईल याची काळजी घ्यावी लागेल. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा केसांना शॅम्पू करताना केसांच्या टोकांवर शॅम्पू लागणार नाही, याकडे लक्ष द्यावे आणि थंड पाण्याने डोके धुवावे. केस धुतल्यानंतर तुम्ही केसांच्या टोकाला कोरफड असलेले चांगले कंडिशनर लावू शकता. कंडिशनर 2 किंवा 3 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून फक्त दोनदा कंडिशनर लावा, जास्त वापरल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या -कृत्रिम केस ड्रायरमुळे तुमचे केस कमकुवत होतात, तुम्ही ते वापरणे टाळावे आणि नैसर्गिक हवेत केस वाळवावे. केसांची निगा राखणे देखील महत्त्वाचे आहे. केस विलग करण्यासाठी आपण रुंद आणि लाकडी कंगवा वापरू शकता, असे केल्याने आपले केस कमी तुटतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Woman hair

    पुढील बातम्या