मुंबई, 01 ऑगस्ट : चांगले जीवन जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास आपण मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो. आपल्यापैकी अनेकजण दररोज असे काही पेय किंवा अन्न खात असतात, ज्याचा मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपण चुकून किंवा नकळतपणे मेंदूसाठी समस्या निर्माण करत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे सेवन मेंदूसाठी हानिकारक ठरू (Worst Foods for Brain) शकते. साखरयुक्त पेयांपासून लांब राहा - अनेकदा लोकांना एनर्जी ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स, सोडा आणि ज्यूस प्यायला आवडतं. मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, बहुतेक साखरयुक्त पेयांमध्ये 55 टक्के फ्रक्टोज आणि 45 टक्के ग्लुकोज असते. यामुळे टाईप 2 मधुमेह आणि हृदयविकाराव्यतिरिक्त मेंदूवरही खूप नकारात्मक प्रभाव पडतो. या गोष्टी खाणाऱ्या लोकांमध्ये अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाची समस्या निर्माण होऊ शकते. रिफाइंड कार्बोहाइड्रेट्स आणि उच्च ट्रान्स फॅट्स - रिफाइंड कार्बोहाइड्रेट्स, ज्यामध्ये साखर आणि उच्च प्रक्रिया (हायली प्रोसेस्ड) केलेले धान्य असते, ते मेंदूसाठी चांगले मानले जात नाहीत. यामध्ये पांढर्या पिठाचा समावेश आहे. त्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होतात. चरबी आणि साखर जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. याशिवाय केक, स्नॅक्स, कुकीज इत्यादी उच्च ट्रान्स फॅट असलेले पदार्थ अल्झायमरचे कारण ठरू शकतात. मीठ आणि साखर जास्त असलेले पदार्थ - मीठ, साखर आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने मेंदूचे खूप नुकसान होते. अशा अन्नामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते आणि अनेक समस्या निर्माण होतात. अशा समस्या टाळण्यासाठी आपण चिप्स, मिठाई, नूडल्स, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, सॉसेज आणि रेडीमेड पदार्थ खाणे टाळावे. आर्टिफिशियल स्वीटनर्स - शुगर फ्रीच्या नावाखाली अनेक उत्पादनांमध्ये आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केला जातो. त्यामध्ये अशी अनेक केमिकल्स आहेत, जी मेंदूच्या ट्रान्समीटरच्या उत्पादनावर परिणाम करतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा धोका देखील लक्षणीय वाढतो. त्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनर्स घातलेले अन्न पदार्थ खाणे टाळावे. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर अल्कोहोल धोकादायक - अल्कोहोलचे अतिसेवन मेंदूसाठी अत्यंत घातक ठरू शकते. अल्कोहोलमुळे ब्रेन वॉल्यूम कमी होतो, चयापचयातील बदल आणि न्यूरोट्रांसमीटरवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन फार कमी प्रमाणात करावे किंवा करूच नये. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.