पावसाळ्यात त्वचारोग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

पावसाळ्यात त्वचारोग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

पावसाळ्यात त्वचेची आर्द्रता कमी होत असल्यामुळे त्वचारोग होण्याची जास्त भीती असते

  • Share this:

मुंबई, 22 जून : पावसात मनसोक्त भिजायला कुणाला बरं आवडणार नाही? पण पावसामुळे उद्भवणारे आजार मात्र त्रासदायक ठरू शकता. या ऋतूमध्ये त्वचा जास्त शुष्क होत असल्यामुळे त्वचारोगांची जास्त भीती असते. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात होणाऱ्या त्वचारोगांवर कोणते आणि कशापद्धतीने उपचार करावेत हे सांगणार आहोत.

मुंबईच्या वातावरणात दमटपणा असल्यामुळे पावसाळ्यातसुद्धा घाम येतो. यामुळे अनेकांना घामोळ्या होतात. रस्त्यांवर साचलेल्या चिखलामुळे पायांच्या बोटांमध्ये चिखल्या होण्याची शक्यता असते. त्यासाठी बाहेरून आल्यानंतर सगळ्यात पहिले गरम पाण्याने हात पाय धुवावे. त्यानंतर पायाची त्वचा कोरडी करण्यासाठी पावडर लावावी. हा उपाय केल्याने चिखल्या तर होत नाही, शिवाय खाज आणि गजकर्णाची भीतीसुद्धा राहत नाही.

पावसाळ्यात डोळे का चुरचुरतात? जाणून घ्या त्यामागची कारणं

पावसाळ्यात त्वचेसाठी शक्यतो सौम्य साबणाचा उपयोग करावा. दिवसातून सकाळी आणि रात्री झोपण्याआधी अशी दोनदा अंघोळ आणि दिवसभरात किमान 2-3 वेळा हात-पाय धुवावे. बाजारात सोप फ्री क्लिंजरसुद्धा उपलब्ध असतात, ज्यामुळे तुमची त्वचा शुष्क पडत नाही. तसंच या दिवसांत शरीरावरील मृत त्वचा हटविण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रबरचा वापर करावा.

त्वचा मुलाम राखण्यासाठी मॉइश्चरायजरचा वापर करावा. जे लोशन बेस्ड असलं तर उत्तम. शक्यतो या दिवसांत मेकअप कमीच करावा. गरज असेल तेव्हाच वॉटप्रूफ मेकअप करावा. पाय कोरडे राहावेत यासाठी अॅऩ्टी फंगल पावडरचा वापर करावा.

पावसाळ्यात काविळ होऊ नये म्हणून घ्या काळजी; करा 'हे' घरगुती उपाय

पावसाळ्यात जीन्स आणि जास्त आखुड कपडे घातल्याने शरीराला खाज सुटण्याची भीती असते. या दिवसात कपडे लवकर वाळत नसल्यामुळे शक्यतो कॉटनच्या कपड्यांचा वापर करावा. लवकर वाळणारे आणि वापरासाठी हलके कपडे घातल्याने गजकर्ण होण्याची शक्यता राहत नाही.

First published: June 22, 2019, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading