मुंबई, 20 जून - पावसाळा सुरू झाला की अनेक आजार वाढतात. त्यात काविळची साथ पसरते. काविळ वाईट परिणाण यकृतावर पडतो. त्यामुळे काविळ झालाय असं कळताच वेळीच त्यावर उपाय केले तर या आजारतून चटकन सुटका होऊ शकते. 'हिपॅटायटिस ए' आणि 'हिपॅटायटिस इ' या दोन प्रकारच्या विषाणुंमुळे काविळ होतो. पावसाळ्यात दुषीत अन्न पदार्थ आणि पाणी प्यायल्यामुळे काविळ होतो. अती मद्यप्राशन, अॅसिडिटी, अति मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने किंवा मलेरियामुळेसुद्धा काविळ संभवतो.
उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर
या आजाराजी प्रमुख लक्षणं म्हणजे, गडद पिवळ्या रंगाची लघवी होते, अचानक वजन कमी होतं, पोटदुखीचा त्रास होतो, जास्त अशक्तपणा जाणवतो, शरीराची त्वचा आणि डोळ्यांमधील पाढरा भाग पिवळा दिसायला लागतो. उलट्या आणि त्वचेला खाज सुटणे ही या आजाराजी प्रमुख लक्षणे आहेत. या आजारावर अॅलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदिक उपचार देखील केले जातात. काविळ लवकर बरा व्हावा यासाठी घरगुती उपाय म्हणून कापलेल्या कांद्यामध्ये लिंबाचा रस, त्यावर काळं मीठ आणि मिरेपूड टाकून दोन वेळ त्याचं सेवन करावं.
ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या फायदे
दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळ-संध्याकाळी एक कप आवळ्याचा ज्यूसमध्ये चमचाभर मध मिसळून तो प्यावा. सकाळी उपाशीपोटी ग्लासभर टोमॅटोचा ज्यूसमध्ये मीठ आणि मिरेपूड टाकून तो प्यावा. तसंच दररजो सकाळी आणि सायंकाळी 4-5 तुळशीची पानं चावून खावी. मुळा आणि त्याच्या पानांचा रससुद्धा या आजारासाठी गुणकारी आहे. काळं मीठ आणि मिरेपूड टाकून मुळ्याचा ज्यूस घ्यावा. रोज पपई खाल्ल्याने किंवा पपईचा ज्यूस पिल्याने किंवा दिवसभरात 2-3 वेळा लिंबू-पाणी पिल्यानेसुद्धा हा आजार कमी होण्यास मदत होते.