मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

छोटीशी चूकही पडेल प्रचंड महागात; अकाली मृत्यूचे संकेत शरीराकडून मिळतात, याकडे दुर्लक्ष नको

छोटीशी चूकही पडेल प्रचंड महागात; अकाली मृत्यूचे संकेत शरीराकडून मिळतात, याकडे दुर्लक्ष नको

अगदी क्षुल्लक चुकादेखील मृत्यूचं कारण बनतात. याचे संकेतही (Death Sign) शरीराकडून मिळत असतात; पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग पश्चात्ताप करण्याचीही संधी मिळत नाही.

अगदी क्षुल्लक चुकादेखील मृत्यूचं कारण बनतात. याचे संकेतही (Death Sign) शरीराकडून मिळत असतात; पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग पश्चात्ताप करण्याचीही संधी मिळत नाही.

अगदी क्षुल्लक चुकादेखील मृत्यूचं कारण बनतात. याचे संकेतही (Death Sign) शरीराकडून मिळत असतात; पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग पश्चात्ताप करण्याचीही संधी मिळत नाही.

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट: अवघ्या 20-25 वर्षांच्या मुलाचा किंवा मुलीचा हृदयविकाराने किंवा अन्य काही कारणाने अकस्मात मृत्यू झाल्याच्या बातम्या अनेकदा आपल्या वाचनात येतात. अशा अकाली मृत्यूमागे काही चुकीच्या सवयीही (Bad Habits) कारणीभूत असू शकतात. रोजच्या सवयींवरूनही अकाली मृत्यूमागचं (Untimely Death) कारण जाणून घेता येऊ शकतं, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तरुण वयात लोक करिअर, आवडीनिवडी याबाबत अतिशय जागरूक असतात; मात्र आरोग्याच्या (Helath) बाबतीत अतिशय निष्काळजी असतात. हाच निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. अगदी क्षुल्लक चुकादेखील मृत्यूचं कारण बनतात. याचे संकेतही (Death Sign) शरीराकडून मिळत असतात; पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग पश्चात्ताप करण्याचीही संधी मिळत नाही.

अगदी तरुण वयात मृत्यू होण्यामागे कोणत्या सवयी असतात, त्याचे संकेत आपले शरीर आपल्याला कसं देत असतं याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. त्यात आढळलेले सात महत्त्वाचे संकेत अकाली मृत्यूचा इशारा देतात, असा दावा त्यांनी केला आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

'द सन'मधल्या एका वृत्तानुसार, व्यक्तीच्या फिजिकल मोटर फंक्शनमधल्या (Physical Motor Function) बिघाडाचे परिणाम साधारण 65 वर्षं वयापासून दिसू लागतात आणि हे मृत्यूचं एक प्रमुख कारण असू शकतं, असा निष्कर्ष ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (British Medical Journal) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात तज्ज्ञांनी नोंदवला आहे. सात वेगवेगळ्या कारणांमुळे अकाली मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचं यात नमूद केलं आहे.

काल्पनिक नाही, हा मुलगा खरंखुरं जगतो मोगलीसारखं आयुष्य! जंगलात राहून खातो गवत

त्यात स्वयंपाक करणं, स्वच्छतागृह वापरणं, खरेदी करणं आणि कपडे घालणे यांसारख्या दैनंदिन कामांसह तुम्ही खुर्चीवरून किती वेळाने उठता अशा कारणाचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे चालण्याची गती आणि एखादी वस्तू पकडण्याची ताकद कमी होत असेल तर ती धोक्याची घंटा असते, असं त्यात म्हटलं आहे. या शारीरिक हालचाली अर्थात मोटर फंक्शनमधले बदल जितक्या लवकर ओळखले जातील, तितक्या लवकर उपचार करणं शक्य होतं आणि अकाली मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो. प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतात, असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

या अभ्यासासाठी तज्ज्ञांनी 1985 ते 88 या कालावधीत 35 ते 55 वर्षे वय असलेल्या आणि दीर्घ काळ जगलेल्या 6 हजार व्यक्तींचा डेटा पाहिला. त्यांना दीर्घायुष्य लाभण्यात सामाजिक, व्यावहारिक आणि जैविक कारणांचा प्रभाव असल्याचं संशोधकांना आढळलं. यानंतर त्यांनी 2007 आणि 2016 या कालावधीतल्या व्यक्तींच्या माहितीचा अभ्यास केला. यात दैनंदिन जीवनशैली, कौशल्य आणि ग्रिप स्ट्रेंग्थ याबाबतची माहिती होती. ऑक्टोबर 2019पर्यंत या कारणांचा प्रभाव असलेल्या मृत्यूच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला.

धक्कादायक! दारूमुळे बळावतोय कॅन्सर; वर्षभरातच सापडले सात लाखांपेक्षा जास्त रुग्ण

त्यात तज्ज्ञांना असं आढळून आलं, की 22 टक्के व्यक्तींचा मृत्यू शारीरिक हालचाली म्हणजे मोटर फंक्शनमधला बिघाड, चालण्याच्या वेगातला बदल यांमुळे झाला आहे. 15 टक्के लोकांचा मृत्यू होण्यामागे हाताची पकड कमी होण्याचं कारण दिसून आलं. खुर्चीवर दीर्घकाळ बसण्याच्या सवयीमुळे 14 टक्के लोकांचा मृत्यू झाला. ज्या लोकांना स्वयंपाक करणं आणि खरेदी करणं अशा कामांमध्ये अडचणी येतात अशा लोकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण 30 टक्के होते. सरासरी वयोमानाच्या 10 वर्षं आधीच मरण पावणाऱ्या व्यक्तींमध्ये दीर्घ काळ खुर्चीवर बसण्याची सवय असलेल्या व्यक्तींचं प्रमाण अधिक होतं.

आपल्याच वाईट सवयी देतात डोकेदुखीला आमंत्रण; थोडा बदल संपवेल कायमचा त्रास

या अभ्यासाचा विचार करता, खुर्चीवर दीर्घ काळ बसणं आणि शारीरिक हालचाली करण्यात अडचणी येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. शरीर देत असलेल्या संकेतांकडे बारकाईने लक्ष ठेवणं कायमसाठीच श्रेयस्कर ठरतं. शिवाय सतत कार्यरत राहणं, जीवनशैली चांगली राखणं, व्यायाम करणं, व्यसनं न करणं, झोपेचं चक्र न बिघडवणं, आहार खूप जास्त किंवा खूप कमी न घेता संतुलित प्रमाणात घेणं या गोष्टी दीर्घायुष्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

First published:

Tags: Death, Death prediction, Health