• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • धक्कादायक! दारूमुळे बळावतोय कॅन्सर; वर्षभरात सापडले सात लाखांपेक्षा जास्त रुग्ण

धक्कादायक! दारूमुळे बळावतोय कॅन्सर; वर्षभरात सापडले सात लाखांपेक्षा जास्त रुग्ण

2020 साली जगभरात एकूण नोंदवलेल्या नव्या कॅन्सर रुग्णांपैकी चार टक्के रुग्णांना मद्यपानामुळे कॅन्सरची लागण झाला आहे.

  • Share this:
मुंबई, 04 ऑगस्ट :  मद्यपान (Alcohol) आरोग्यास हानिकारक, असा इशारा आपण जागोजागी पाहतो. दारूमुळे किडनी, म्हणजेच मूत्रपिंडाचे विकार होतात. लिव्हर म्हणजे यकृत खराब होतं हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण अति मद्यपानामुळे कॅन्सरसाऱख्या भयंक आजाराचाही (Alcohol causes cancer) धोका निर्माण होत असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. 2020 साली अति मद्यपानामुळे सुमारे साडे सात लाख लोकांना कॅन्सरची (Alcohol and cancer relation) लागण झाल्याचं या संशोधनात समोर आले आहे. लँसेट आँकोलॉजी (Lancet Oncology) या नियतकालिकाच्या जुलै 2021 मधील आवृत्तीत हा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2020 सालातील एकूण नव्या कॅन्सर रुग्णांपैकी (Cancer patients registered in 2020) चार टक्के रुग्णांना मद्यपानामुळे कॅन्सरची लागण झाल्याचे यात सांगण्यात आलं आहे. यात सर्वाधिक अमेरिकी नागरिकांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे वाचा - सौंदर्यात भर घालणाऱ्या लिपस्टिकमुळे होतो कॅन्सर; विकत घेताना जरूर तपासा केमिकल दारूमुळे कॅन्सर झालेल्या एकूण रुणांपैकी 75 टक्के पुरुष होते, तर बाकी महिला होत्या. यापैकी बहुतांश पुरुषांमध्ये लिव्हर किंवा गळ्यापासून पोटापर्यंत असणाऱ्या अन्ननलिकेला कॅन्सरची लागण झाल्याचं दिसून आलं. तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast Cancer due to alcohol) प्रमाण सर्वाधिक होतं. यामध्ये बहुतांशपणे एका दिवशी दोन किंवा त्यापेक्षा अधिक ड्रिंक्सचे (Cancer and Alcohol) सेवन करणाऱ्या लोकांचा समावेश होता, असंही या अहवालात म्हटलं आहे. हे वाचा - लसीकरणानंतर संसर्गाची चिंता सोडा! nOPV2 लस देणार टक्कर, WHO नेसुद्धा दिली मंजुरी नॉर्थ-वेस्टर्न मेडिसीनमध्ये थोरेसिक सर्जन असलेले डॉक्टर डेव्हिड ऑडेल यांनी सांगितलं, दारू हे उत्तेजक पेय आहे. याच्या अति सेवनामुळे अन्ननलिका, पोटाचे विकार, तोंडाचा आतला भाग याला इजा होते. बऱ्याच वेळा आपले शरीर स्वतःच ही इजा ठीक करण्याचा प्रयत्न करते. मात्र कित्येक वेळा यातूनच कॅन्सरची (Cancer due to alcohol) सुरुवात होते.
First published: