Home /News /lifestyle /

स्वतःसाठी नाही पण नातवंडांसाठी तरी धूम्रपान सोडा! SMOKING चा असा होतोय वाईट परिणाम

स्वतःसाठी नाही पण नातवंडांसाठी तरी धूम्रपान सोडा! SMOKING चा असा होतोय वाईट परिणाम

चित्रपटगृहात चित्रपट सुरू व्हायच्या आधी दाखवली जाणारी 'मुकेश'ची जाहिरात आठवते का? मुकेशसारखे कितीतरी लोक धुम्रपानामुळे आपलं आणि आपल्या आजूबाजूच्यांचं आयुष्य खराब करत असतात. पण याबाबतीत समोर आलेला नवा अभ्यास धक्कादायक आहे

मुंबई, 26 जानेवारी: चित्रपटगृहात चित्रपट सुरू व्हायच्या आधी दाखवली जाणारी 'मुकेश'ची जाहिरात आठवते का? मुकेशसारखे कितीतरी लोक धुम्रपानामुळे आपलं आणि आपल्या आजूबाजूच्यांचं आयुष्य खराब करत असतात. अनेक वर्षांपासून केलेल्या अभ्यासातून हेच समोर आलं आहे की धूम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे. धूम्रपानाचा विपरीत परिणाम तुमच्या फुफ्फुसांवर होतो, त्यामुळे तुम्हाला कर्करोग देखील होऊ शकतो. पण समोर आलेल्या एका नवीन संशोधनानुसार, जरी तुम्ही धूम्रपान करत नसाल पण तुमच्या पूर्वजांपैकी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतात असं सिद्ध झालं आहे. या संशोधनानुसार, कोणाला जर धूम्रपानाचे व्यसन असेल तर त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या काही पिढ्यांपर्यंत टिकू शकतात. याचा सरळ अर्थ असा होतो की धूम्रपान तुम्ही करत असाल तर त्याचे दुष्परिणाम तुमच्यासोबतच तुमची नातवंडं, पतवंडं यांना भोगावे लागू शकतात. ब्रिटनमधील ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. हे वाचा-Shocking! जोशात 40 किलो वजन उचलायला गेली तरुणी आणि हात तुटून धडापासून वेगळा झाला 30 वर्षांच्या अभ्यासानंतर सापडला पुरावा या संशोधनाला चिल्ड्रन ऑफ नाईन्टीज (Children of 90’s) असं नाव देण्यात आलं आहे. कारण चिल्ड्रेन ऑफ नाईन्टी या प्रकल्पांतर्गत हे संशोधन करण्यात आलं आहे. हे संशोधन नुकतंच सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये (Scientific Report Journal) प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनासाठी गेल्या 30 वर्षांत रक्त, लघवी, प्लासेन्टा, केस, नखं यांचे 1.5 दशलक्ष नमुने गोळा करण्यात आले होते. या अभ्यासाचा उद्देश जनुकीय अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती गोळा करणं हा होता. या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की धूम्रपानाचे दुष्परिणाम केवळ धूम्रपान करणाऱ्यांपुरतेच मर्यादित नसून पुढील पिढ्यांवर त्याचा परिणाम दिसून येतो. या अभ्यासात फक्त आजोबा आणि पणजोबा यांचा समावेश करण्यात आला होता कारण पण आजी-पणजी यांचा समावेश नव्हता कारण त्यांच्या तारुण्याच्या काळात धूम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी होती. हे वाचा-पोटातून आवाज येत असतील तर दुर्लक्ष नको; तातडीने सुरू करा हे उपाय! नातवंडांवर होणारा परिणाम या संशोधनात असं समोर आलं की, अशा महिला ज्यांच्या आजोबा किंवा पणजोबा तारुण्यातच धूम्रपान करणं सुरु केलं होतं, त्या महिलांच्या शरीरातील चरबी वाढली आहे. यात असंही समोर आलं की, ज्यांचे आजोबा-पणजोबा 13 वर्षांचे होण्यापूर्वीच धूम्रपानाच्या आहारी गेले होते त्यांच्या शरीरात चरबी जास्त होती. या तुलनेत ज्यांच्या आजोबा किंवा पणजोबांनी उशिरा धूम्रपान सुरु केलं त्यांच्या शरीरात चरबी कमी असल्याचं आढळलं. या संशोधनातील आश्चर्यकारक बाब म्हणजे, आजोबा-पणजोबांच्या धूम्रपानाचा परिणाम केवळ नातींवर किंवा पणतींवरच दिसून आला, नातवांवर किंवा पतवंडांवर याचा काहीही परिणाम दिसला नाही. हे वाचा-फक्त खोबरेल तेलच नाही, थंडीच्या दिवसात हे 5 तेल केसांना देतील संपूर्ण पोषण आजकाल धूम्रपान करणं हे एक ‘स्टेटस सिम्बॉल’ बनलं आहे. त्यामुळे सध्याच्या पिढीच्या या स्टेटसचे परिणाम पुढच्या पिढीवर काय आणि कसे होतील हे तर येणारा काळच सांगू शकेल. पण ही बातमी वाचल्यावर किमान तुमच्या नातवंडांच्या काळजीपोटी तरी तुम्ही धूम्रपान टाळू किंवा सोडू शकता हे मात्र नक्की.
First published:

Tags: Smoking

पुढील बातम्या