जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पोटातून आवाज येत असतील तर दुर्लक्ष नको; तातडीने सुरू करा हे उपाय!

पोटातून आवाज येत असतील तर दुर्लक्ष नको; तातडीने सुरू करा हे उपाय!

पोटातून आवाज येत असतील तर दुर्लक्ष नको; तातडीने सुरू करा हे उपाय!

जेवल्यानंतर अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे अनेकांच्या पोटातून आवाजही येतात. ( Stomach Sound) हा आवाज सतत येत असेल तर हे गंभीर आजाराचे संकेत असतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 25 जानेवारी : ‘आरोग्यम् धनसंपदा’ असं म्हटलं जातं. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, ( Health is Wealth) असा त्याचा अर्थ. ज्याचं आरोग्य चांगलं तोच खरा श्रीमंत; मात्र आजच्या काळात बदललेल्या, विचित्र जीवनशैलीमुळे आरोग्य बिघडण्याची वारंवारिता जास्त असते. अनेकांना वेगवेगळे प्रकारचे आजार होतात. पोटाचे आजार होण्याचं प्रमाण तर बऱ्यापैकी जास्त आहे. जेवल्यानंतर अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे अनेकांच्या पोटातून आवाजही येतात. ( Stomach Sound) हा आवाज सतत येत असेल तर हे गंभीर आजाराचे संकेत असतात. वैद्यकीय भाषेत या समस्येला स्टमक ग्राउलिंग ( Stomach growling) असं म्हटलं जातं. त्या समस्येवर मात करण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयी बदलणं आवश्यक असतं. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. भूक लागल्यामुळे पोटातून काही वेळा आवाज येतो, असं मानलं जातं. एका संशोधन अहवालात असं म्हटलं आहे, की जेव्हा अन्न लहान आतड्यात पोहोचतं, तेव्हा शरीर अन्नाच्या कणांचं विघटन करण्यासाठी विकरं म्हणजेच एन्झाइम्स सोडतं. तेव्हा पचनाच्या क्रियेदरम्यान असा आवाज येतो. अन्नाच्या पचनादरम्यान पोटातून आणि आतड्यातून असा आवाज येतो, असंही मानलं जातं. आतडं रिकामं असल्यामुळे या ठिकाणाहून अन्न जातं, तेव्हाही आवाज येतो, असं मानलं जातं; मात्र पोटातून आवाज येणं थांबत नसेल तर हा एक गंभीर आजार आहे, अशी शक्यता नाकारता येत नाही. क्रोहन रोग, अन्न अॅलर्जी, अतिसार, आतड्यात रक्तस्राव, मोठ्या आतड्यात सूज आदी कारणांमुळेही पोटातून आवाज येऊ शकतो. यामुळे पोटातून सातत्याने आवाज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेतला पाहिजे. डॉक्टर लक्षणांच्या साह्याने योग्य निदान करून योग्य औषधोपचार करू शकतात आणि तुम्ही लवकर बरे होऊ शकता. हे ही वाचा- फळं-भाज्यांच्याबाबतीतील ही एक चूक अनेकांच्या घरी करतात; नंतर औषधांवर होतो खर्च पोटातून येणारा आवाज बंद व्हावा यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं. पाणी तहान भागवण्यासोबतच पचनक्रियेतही मदत करतं. पोटातले आवाज बंद करण्यासाठी पाण्याची मदत होते. पोट रिकामं असल्यामुळेदेखील पोटातून आवाज येतो, असंही म्हटलं जातं. त्यामुळे असे आवाज येत असतील, तर काही तरी खायला हवं. खाल्ल्यानंतर हे आवाज बंद होऊ शकतात. पोटातून आवाज येण्याच्या समस्येवर पाणी पिणं हा उपाय आहेच. जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांकडेही जाणं गरजेचं आहे; मात्र यासोबतच पुदिना, आलं आणि बडीशेप यांपासून बनवलेला हर्बल चहा तुमच्या पचनास मदत करू शकतो. यामुळे तुमच्या आतड्यांच्या स्नायूंना आराम मिळेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात