मुंबई, 18 जून : मुतखडा होणं ही एक कॉमन समस्या बनत चालली आहे. मात्र. योग्य उपचाराने मुतखडा लवकर बरा होऊ शकतो. शरीरातील खनिजे आणि क्षार जेव्हा स्टोनचे रूप धारण करतात तेव्हा त्याला आपण मुतखडा झाला म्हणतो. हे बहुतेक खडे मुगाच्या दाण्याएवढे असतात, परंतु कधीकधी ते वाटाण्यापेक्षाही मोठे असू शकतात. शरीरात पाण्याची कमतरता हे मुतखडा होण्याचे मुख्य कारण आहे. संशोधना नुसार, यूरिक अॅसिड राखण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. पाणी कमी पिणे हे अनेकदा किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण (home remedy for kidney stones) असते. व्हिटॅमिन-डी किंवा कॅल्शियम सब्स्टीट्यूट दीर्घकाळ घेतल्यास शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मुतखडे होऊ शकतात. वाढलेला लठ्ठपणा, कमी झालेली शारीरिक हालचाल, उच्च रक्तदाब आणि शरीरात कॅल्शियमचे कमी झालेले शोषण यामुळेही मुतखडे होऊ शकतात. जास्त मीठ किंवा प्रथिनयुक्त आहार जसे की मटण, चिकन, चीज, मासे, अंडी, दूध यामुळे देखील मुतखडा होऊ शकतो. मुतखड्यावरील घरगुती उपाय - सफरचंद व्हिनेगर - सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये सायट्रिक अॅसिड चांगल्या प्रमाणात असते, जे किडनी स्टोनचे लहान तुकडे करण्याचे काम करते. दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्यासोबत घेतल्याने मुतखड्याच्या समस्येत खूप आराम मिळतो. ऑलिव्ह आणि लिंबू - लिंबाचा रस मुतखडे फोडण्यास मदत करतो आणि ऑलिव्ह ऑइल मुतखडा बाहेर काढण्यास मदत करतो. एक ग्लास पाण्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल टाका. नीट मिक्स करून प्यायल्याने काही वेळात मुतखडा निघून जाऊ शकतो. डाळिंबाचा रस - मुतखड्याच्या समस्येवर डाळिंब जास्त चांगले काम करते. त्याचा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि किडनी स्टोनमध्ये खूप आराम मिळतो. हे वाचा - डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या कडुलिंब - कडुलिंबाची पाने जाळून भस्म बनवा आणि रोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा पाण्यासोबत घ्या. Kalanchoe pinnata - पाथर चट्टा (Kalanchoe pinnata) वनस्पती कुठेही सहज सापडते. एका पानात थोडी साखर घालून बारीक करा. दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्यास मोठमोठे खडे देखील काही वेळात बरे होतात. हे वाचा - मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा कुळीत - जर मुतखडे लहान असतील तर कुळीत डाळीचे सेवन केल्याने अनेक वेळा खडे आपोआप वितळतात आणि बाहेर पडतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.