• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मधुमेह टाळता येऊ शकतो, त्यासाठी 'असा' असायला हवा आहार

मधुमेह टाळता येऊ शकतो, त्यासाठी 'असा' असायला हवा आहार

नियमित व्यायाम केल्याने मधुमेह तुमच्यापासून चार हात लांब राहतो

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 जून : मधुमेहाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लवकर येणारा आणि दुसरा उतारवयात येणारा मधुमेह. दुसरा प्रकार सहसा चाळिशीनंतर आढळतो. एकूण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याचेच प्रमाण जास्त आढळते. लवकर येणारा मधुमेह हा अगदी जन्मापासून ते तरुण वयापर्यंत कधीही सुरू होऊ शकतो. जर आहारावर नियंत्रण नसेल तर दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते, याची पुष्टी मधुमेहींच्या पोषण आहारासंदर्भात बाल्टिमोर येथे पार पडलेल्या बैठकीत संशोधकांनी दिली. या बैठकीत मांडण्यात आलेल्या रिसर्चमध्ये ज्या लोकांच्या आहारात फळं, भाज्या, कडधान्य, शेंगा, वनस्पती तेलासा समावेश असतो, अशा 60 टक्के लोकांना इतरांच्या तुलनेत किमान 20 वर्षापर्यंत मधुमेह होण्याची शक्यता राहत नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे. उत्तम शरीरयष्टी कमवायची असेल तर 'हा' संतुलित आहार तुम्ही घ्यायलाच हवा इतर निष्कर्षांमध्ये असंही सुचविण्यात आले आहे की, आहारात व्हिटॅमिन बी2 आणि बी6 घेणाऱ्यांनासुद्धा दुसऱ्या प्रकारचा म्हणजे चाळिशीनंतर होणाऱ्या मधुमेहाचा धोका कमी असतो. टाईप-2 मधुमेह हा अनेकांसाठी काळजीचा विषय बनला आहे. असे काही उपाय आहेत ज्यामुळे  मधुमेह टाळता येऊ शकतो. वनस्पतीजन्य आहारामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत होते. पण वनस्पतीजन्य आहारात फायबर असल्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे आहार पद्धतीत बदल केल्यास दुसऱ्या प्रकारचा मधुमेहाचा धोका कमी होतो. भात खाण्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे भात खाणं टाळावं. दररोज सकाळी उठल्यावर खा 'हे' फळ; कधीच जावं लागणार नाही तुम्हाला डॉक्टरकडे नियमित व्यायाम करण्याची सवयसुद्धा चांगली आहे. यामुळे मधुमेह तुमच्यापासून चार हात लांब राहतो. प्रमुख्याने लठ्ठ लोकांना मधुमेह होतो. म्हणून दुसऱ्या प्रकारचा मधुमेहाची शक्यता कमी करायची असेल तर आधी तुम्हाला वजन कमी करावं लागेल. त्यासाठी आपल्या आहारात मांस, चिकन, अंडी, दुग्ध, ब्रेड असे  व्हिटॅमिन बी2 आणि बी6 यांनी समृध्द असलेलं अन्न समाविष्ट करावं. खूप जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानेसुद्धा आपल्या वजनावर परिणाम होतो. वजन वाढल्यामुळे मधुमेहाची शक्यता बळावते. त्यामुळे गोड पदार्थ खा पण जरा जपून, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
  First published: