दररोज सकाळी उठल्यावर खा 'हे' फळ; कधीच जावं लागणार नाही तुम्हाला डॉक्टरकडे

दररोज सकाळी उठल्यावर खा 'हे' फळ; कधीच जावं लागणार नाही तुम्हाला डॉक्टरकडे

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर दररोज सकाळी तुम्ही एक सफरचंद खायलाच हवं

  • Share this:

मुंबई, 7 मे : आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर दररोज सकाळी तुम्ही एक सफरचंद खायलाच हवं. सफरचंद खाल्ल्याने बरेच आजार तुमच्यापासून दूर राहतात. असं म्हटलं जातं की, दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला कधीच डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही. सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. सफरचंद खाण्यामुळे अल्झायमर, कर्करोग आणि ट्यूमरसारखे रोग होत नाही, असा दावा बऱ्याच संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. ह्रदयरोगासाठी सफरचंद उपयुक्त ठरतं.

कॅन्सर - सफरचंदात असे काही गुणतत्त्व आहेत जे क्वरसिटीन पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वचवितात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

मधुमेह - सफरचंदातील ‘पेक्टिन’ शरीरातील ग्लाक्ट्रॉनिक आम्लाची  गरज पूर्ण करतं आणि इन्सुलिन म्हणूनही काम करतं त्यामुळे सफरचंद मधुमेहींसाठी गुणकारी आहे.

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

लिव्हर ठेवतं स्ट्राँग - दररोज आपल्या पोटात अनेक विषाक्त पदार्थ जातात. शरीरातील असे विषारी पदार्थ नष्ट करण्याचं काम लिव्हर करत असतं. जर लिव्हर स्ट्राँग ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज एक सफरचंद खायलाच हवं. सफरचंदात मोठ्या प्रमाणात एन्टीऑक्सिडेंट असतात जे लिव्हर स्ट्राँग ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

पचनक्रीया - सफरचंदात ‘फायबर’ असल्य़ामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. सफरचंद सालीसकट खाल्ल्याने कफाचा त्रास होत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती - लाल रंगाच्या सफरचंदात क्वरसीटीन नावाचं एन्टीऑक्सिडंट असतं. जे रोगप्रतिकारक क्षमता उत्तम ठेवण्यासाठी मदत करतं.

कोलेस्ट्रॉल - सफरचंदात कोलेस्ट्रॉल विरघळविणारे तत्त्व असतात. जे शरीरात जमा होणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. ह्रदयरुग्णांसाठी सफरचंद उत्तम आहे.

मशरूम खरेदी करताना अशी घ्या काळजी, नाही तर जाऊ शकतो जीव

वजन नियंत्रित ठेवतं - वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सफरचंद अत्यंत गुणकारी आहे. स्थूलपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार संभवतात. पण सफरचंदमध्ये आढळणारे फायबर वजन कमी करण्यास मदत करत असल्यामुळे हे सगळे आजार दूर राहतात.

एनिमिया - सफरचंदात मोठ्या प्रमाणात आर्यन्स असल्यामुळे एनिमिया सारख्या आजारांवर हे फळ रामबाण इलाज ठरतं. दररोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्यास शरीराची पूर्ण दिवसाची लोहाची गरज पूर्ण होते.

दात ठेवतं निरोगी - सफरचंदात एन्टीव्हायरल प्रॉपर्टीज असतात ज्या दातांना किटाणू आणि विषाणूपासून दूर ठेवतात. तसेच तोंडातील लाळेचे प्रमाणही वाढवितात.

 

First published: June 7, 2019, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading