• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • उत्तम शरीरयष्टी कमवायची असेल तर 'हा' संतुलित आहार तुम्ही घ्यायलाच हवा

उत्तम शरीरयष्टी कमवायची असेल तर 'हा' संतुलित आहार तुम्ही घ्यायलाच हवा

ग्रोथ हार्मोन्सच्या वाढीसाठी 'हा' आहे आवश्यक आहार

 • Share this:
  मुंबई, 8 जून - उत्तम शरीरयष्टी मिळवायची असले तर ह्यूमन ग्रोथ हार्मोन्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी प्रथिनयुक्त संतुलित आहार तुम्ही घ्यायला हवा. आज आम्ही प्रथिनयुक्त संतुलित आहार तुम्हाला कोणत्या पदार्थांमधून मिळू शकतो हे सांगणार आहोत. मांस आणि मासे - हे अमिनो अॅसिडचे सगळ्यात महत्त्वाचे स्त्रोत आहेत. जे पूर्णपणे प्रोटीनने समृद्ध असतात. यामुळे शरीराला अमिनो अॅसिडचा पुरवठा होतो. जे आपल्या शरीरात ह्यूमन ग्रोथ हार्मोन्स वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अंजिरात असतात भरपूर पोषणमूल्यं; 'हे' आहेत फायदे दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी - दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. ह्यूमन ग्रोथ हार्मोन्सची वाढ होण्यासाठी आवश्याक असणारं अमिनो अॅसिड यातून भरपूर प्रमाणात शरीराला मिळतं. ग्लासभर दूध किंवा सोया मिल्कमध्ये साधारण 8 ग्रॅम प्रथिनं असतात. तर स्ट्रिंग पनीरच्या एका तुकड्यात किंवा मोठ्या अंड्यात 6 ग्रॅम प्रथिनं असतात. प्रथिनयुक्त भाज्या खा - आवश्यक अमिनो अॅसिड मिळविण्यासाठी वनस्पतीजन्य प्रथिनांचा स्त्रोत असलेल्या भाज्या खा. अधिकांश वनस्पतीजन्य प्रथिनांमध्ये काही प्रमाणात अमिनो अॅसिड असतं. दररोज सकाळी उठल्यावर खा 'हे' फळ; कधीच जावं लागणार नाही तुम्हाला डॉक्टरकडे गरज लक्षात घ्या - जर तुम्हाला ह्यूमन ग्रोथ हार्मोन्स वाढवायचे असतील तर तुम्हाला नियमित व्यायामसुद्धा करायलाच हवा. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक पाऊंडासाठी म्हणजेच 453 ग्रॅमसाठी 8 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतं. आहाराद्वारे आवश्यक प्रोटिन आणि अमिनो अॅसिड कसं मिळविता येईल याची आहार तज्ज्ञांकडून माहिती जाणून घ्या.
  First published: