जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / व्यवस्थित पचन होत नाही? आयुर्वेदानुसार या छोट्या-छोट्या चुका आपण वेळीच सुधारा

व्यवस्थित पचन होत नाही? आयुर्वेदानुसार या छोट्या-छोट्या चुका आपण वेळीच सुधारा

व्यवस्थित पचन होत नाही? आयुर्वेदानुसार या छोट्या-छोट्या चुका आपण वेळीच सुधारा

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर 5 चुका सांगितल्या आहेत, ज्या आपण टाळल्या पाहिजेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : आरोग्य चांगले राखण्यात पोट सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. निरोगी आरोग्यासाठी जंक फूड टाळून योग्य आहार घेणं पुरेसं नाही. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी, पचनक्रिया (Digestion) सुधारण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. वास्तविक, अनेक वेळा आपण जे काही खातो ते पचण्यात अडचण येते, कारण आपली पचनसंस्था खाल्लेले अन्न नीट पचवू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या पचनसंस्थेकडे दुर्लक्ष केले तर पुरेसे अन्न खाऊनही आपल्याला पुरेसे पोषण मिळत (Poor Digestion according to Ayurveda) नाही. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर 5 चुका सांगितल्या आहेत, ज्या आपण टाळल्या पाहिजेत.

जाहिरात

जेवणानंतर लगेच आंघोळ - आयुर्वेदानुसार, शरीर पाच तत्वांनी बनलेले आहे. अन्न खाल्ल्यानंतर अग्नि तत्व सक्रिय होतं. हे अन्न पचनासाठी जबाबदार घटक आहे. पण, आपण अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करतो, तेव्हा शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते. योग्य पचनासाठी जेवण आणि आंघोळ यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असावे. जेवणानंतर लगेच चालणे - जेवल्यानंतर जेव्हा आपण चालतो, पोहतो किंवा व्यायाम करतो तेव्हा वात दोष तीव्रतेने जागृत होतो. यामुळे अयोग्य पचन होतं आणि त्यामुळे पोषक तत्व पूर्णपणे शोषले जात नाहीत आणि नंतर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. दुपारी 2 नंतर जेवण - आयुर्वेदानुसार जेव्हा सूर्य आकाशात शिखरावस्थेत असतो तेव्हा पित्त शरीरात सर्वोच्च असते. हा प्रकार दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत होतो. पित्त सहज पचनास मदत करत असल्याने पचनाच्या समस्या टाळण्यासाठी दिलेल्या वेळेत दुपारचे जेवण करावे. याच कारणाने दुपारचे जेवण दिवसातील सर्वात महत्वाचे जेवण मानले जाते आणि ते नेहमी हेवी असावे. हे वाचा -  90% किडनी खराब झाल्यावर लोक डॉक्टरांकडे जातात; अगोदरच ही टेस्ट केलेली शहाणपणाचं! रात्री दही खाणे - रात्री, पित्त दोषासह कफ दोष नेहमीच प्रबळ असतो. रात्री दही खाल्ल्याने शरीरात कफ वाढू शकतो. ज्यामुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. यामुळे रात्रभर दही पोटात राहू शकतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. हे वाचा -  बॉडी स्ट्रेचिंग करणे का गरजेचे आहे? सर्वात महत्त्वाची ही 5 कारणं जाणून घ्या जेवणानंतर लगेच झोपणे - तुम्ही दिवसाचे शेवटचे जेवण झोपायला जाण्यापूर्वी किमान तीन तास आधी केले पाहिजे. याचे कारण असे की, आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी शरीराची उर्जा दोन प्रमुख गोष्टींवर केंद्रित असते - शरीराला बरे करणे आणि मनाला दिवसाचे विचार, अनुभव आणि भावना “पचवण्यास” मदत करणे. जर आपण झोपण्यापूर्वी काहीही खाल्ले तर ते या दोन क्रियांमधली ऊर्जा पचनक्रियेत बदलते. यामुळे मानसिक पचन आणि शारीरिक उपचाराची प्रक्रिया थांबते. या टिप्स वापरल्यानंतर नक्की चांगला परिणाम दिसून येईल, असे डॉक्टर सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात