नवी दिल्ली, 12 मार्च : त्वचेची काळजी घेणं (Skin care) आणि केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करतो. त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आणि केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. पण, अनेकांना कापूर तेलाचे फायदे माहीत नाहीत. कापूल तेलामुळे त्वचा आणि केसांमध्ये मॉइश्चरायजरसह अनेक फायदे होऊ शकतात. अनेकांच्या घरात कापराशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. त्याचबरोबर अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्येही कापराचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटीबायोटिक आणि अँटी-फंगल घटक त्वचेच्या अनेक समस्या आणि केसांचे प्रोब्लेम्स कमी करण्यात मदत करतात. कापूर तेलाचा (Camphor Oil) रोज वापर केल्याने अनेक समस्या कमी होतील. तुम्हालाही त्वचा आणि केसांवर कापूर तेल वापरायचे असेल तर तुम्ही ते घरीही तयार (Homemade Camphor Oil Benefits) करू शकता. कापूर तेल कसं बनवायचं कापूर तेल बनवायला खूप सोपं आहे. सर्वप्रथम 1 वाटी खोबरेल तेल घ्या. त्यात कापराचे काही तुकडे बारीक पेस्ट करून टाका आणि हे तेल हवाबंद कुपीमध्ये ठेवा आणि एक ते दोन दिवस राहू द्या. यादरम्यान, खोबरेल तेल कापराचे सर्व गुणधर्म शोषून घेते. आता तुम्ही नियमितपणे हे कापूर तेल लावू शकता. कापूर तेल लावण्याचे काही फायदे जाणून घेऊया. मुरुमे-पुरळ गायब होतील कापूर तेलामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक त्वचेवरील मुरुमे आणि पिंपल्स घालवण्याचे काम करतात. तसेच कापूर तेल रोज लावल्याने मुरुमे आणि मुरुमांमुळे होणारे डागही कमी होऊ लागतात. फुटलेल्या टाचांसाठी फायदेशीर कापूर तेल फुटलेल्या टाचा आणि इन्फेक्शन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी कोमट पाण्याच्या टबमध्ये थोडेसे हे तेल मिसळा. आता या पाण्यात पाय टाकून थोडावेळ बसा. नंतर पाय बाहेर काढा आणि घोटे चांगले स्वच्छ करा. काही दिवस ही पद्धत अवलंबल्यानंतर टाचा मऊ होतील आणि पायही खूप सुंदर दिसू लागतील. हे वाचा - आजार कित्येक उपाय फक्त एक; कडुलिंबाच्या पानांचा ज्युस यामुळे ठरतो गुणकारी केस निरोगी ठेवण्यास उपयुक्त केसांना नियमितपणे कापूर तेल लावल्याने केसांच्या अनेक समस्या कमी होतात. यासाठी तुम्ही केसांना डायरेक्ट कूपर तेलाने मसाज करू शकता. दुसरीकडे, दह्यात कापूर तेल घातल्याने केस खूप रेशमी आणि चमकदार होऊ शकतात. डागांसाठी बर्याच वेळा त्वचा भाजते, कापते किंवा मुरुमांमुळे डाग राहतात. या सर्व प्रकारांवर कापूर तेल रोज लावल्याने सर्व प्रकारचे डाग निघून जातात. हे वाचा - डोळ्यांच्या सिंपल मेकअपसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स; अनेक प्रसंगी येतील कामी कोंडा कमी होईल केसांमध्ये नियमितपणे कापूर तेलाची मालिश केल्याने कोंड्याची समस्या कमी होते. उलट केसांमध्ये उवा होणे, खाज सुटण्याचा त्रास देखील कमी होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.