जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सतत चिंता-काळजी वाटत असेल तर असतो Anxiety चा त्रास; आहारात असा बदल करून रिलॅक्स व्हा

सतत चिंता-काळजी वाटत असेल तर असतो Anxiety चा त्रास; आहारात असा बदल करून रिलॅक्स व्हा

सतत चिंता-काळजी वाटत असेल तर असतो Anxiety चा त्रास; आहारात असा बदल करून रिलॅक्स व्हा

तणाव, अस्वस्थता, भीती आणि सतत चिंता वाटणं हे Anxiety चे सर्वसामान्य लक्षण आहे, ज्यामुळे एखाद्याला दैनंदिन कार्य करणे कठीण होते. चिंताग्रस्त रुग्णांवर औषधोपचार, व्यायाम आणि श्वासोच्छवासाचे तंत्र इत्यादींद्वारे उपचार केले जातात. यासोबतच, पोषक आहार देखील यावर खूप विशेष भूमिका बजावतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 एप्रिल : सारखी चिंता वाटणं (कारणं काहीही असो) हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीतील एक कॉमन मानसिक आजार बनला (Anxiety Problem) आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, याचा जगातील सुमारे 7.6 टक्के लोकसंख्येवर परिणाम होतो. तणाव, अस्वस्थता, भीती आणि सतत चिंता वाटणं हे Anxiety चे सर्वसामान्य लक्षण आहे, ज्यामुळे एखाद्याला दैनंदिन कार्य करणे कठीण होते. चिंताग्रस्त रुग्णांवर औषधोपचार, व्यायाम आणि श्वासोच्छवासाचे तंत्र इत्यादींद्वारे उपचार केले जातात. यासोबतच, पोषक आहार देखील यावर खूप विशेष भूमिका बजावतो. IndianExpress.com ने दिलेल्या बातमीत, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या आहारज्ज्ञ ज्योती भट्ट यांनी सांगितले की, “आपले वेगवेगळे मूड्स – मग ते आनंद असो दुःख, राग, नैराश्य किंवा चिंता असो, या गोष्ची संतुलित करण्यात आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. संशोधकांनी मेंदूच्या आरोग्याशी संबंधित काही पदार्थ आणि पोषक तत्वांचा अभ्यास (Anxiety Problem Tips) केला आहे. पोषण मनोचिकित्सक (Nutrition Psychiatrist) डॉ. उमा नायडू यांनी त्यांच्या Instagram वर 9 खाद्यपदार्थांची यादी दिली आहे. याद्वारे तुम्हाला तुमची चिंता कमी करण्यास मदत होईल, तुम्हाला शांत आणि आरामशीर वाटेल. .

जाहिरात

भाज्या पालक, बीट्स, ब्रोकोली आणि इतर काही भाज्या चिंता कमी करण्यास मदत करतात. ब्लूबेरी ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात. त्यात खनिजे असतात, त्यामुळे प्रभावीपणे चिंता-काऴजी वाटण्याचा त्रास कमी होतो. आंबवलेले अन्न पदार्थ वेबएमडीच्या माहितीनुसार, चिंता वाटणे, काळजीत असणे अनेकदा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणांमुळेही होऊ शकते. त्यामुळे आंबवलेले अन्नपदार्थ आतड्यांमधील दाह कमी करून गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे कमी करण्यास मदत करतात. काजू आणि ड्रायफ्रुट्स काजू आणि ड्रायफ्रुट्ससारखे प्रथिनांचा स्त्रोत असलेले घटक शरीराला अमीनो अ‌ॅसिडचा पुरवठा करतात. ज्याचे शरीर मूड-लिफ्टिंग न्यूरोट्रांसमीटरमध्ये रूपांतरित करते, उदा. सेरोटोनिन. त्याचा फायदा होतो. शेंगा सर्वसाधारणपणे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शेंगा उदा. वाटाणे, सोयाबीन, भूईमूग इत्यादी खायला हव्या. यामुळेही चिंता कमी होण्यास मदत होते. मासे - बर्‍याच अभ्यासांनुसार, सॅल्मन मासे खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात चिंता कमी होऊ शकते, असे दिसून आले आहे. हे वाचा -  दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी आहारात घ्या या 5 गोष्टी; आरोग्यासाठीही आहेत उत्तम संपूर्ण धान्ये संपूर्ण धान्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन घटकांनी समृद्ध असतात, या दोन्ही गोष्टी चिंता कमी करतात आणि मूड सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत. औषधी वनस्पती आणि मसाले औषधी वनस्पती म्हणजे जीरा, अश्वगंधा, लसूण, हळद, लिंबू आणि तुळस या गोष्टी आहारात असल्यास चिंता कमी करण्यास मदत होऊ शकते. हे वाचा -  चिकू आवडतो ना? हाडं होतात बळकट सोबतच आरोग्याला होतात हे मोलाचे फायदे डार्क चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये एपिकेटचिन आणि कॅटेचिनसारखे फ्लेव्होनॉल असतात. ही संयुगे आहेत जी अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात, जी चिंता कमी करण्यासाठी ओळखले जातात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात