Home /News /lifestyle /

फक्त मिसळा दोनच पदार्थ; तुमचा साधा चहाही होईल इम्युनिटी बुस्टर

फक्त मिसळा दोनच पदार्थ; तुमचा साधा चहाही होईल इम्युनिटी बुस्टर

रोज चहा पिऊनच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

मुंबई, 30 जून: कोरोनाच्या साथीनं (Corona Pandemic) रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) चांगली असणं किती महत्त्वाचं असतं, हे अधोरेखित केलं आहे. कोरोनाच्या विषाणूशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. तरच आपण कोविड-19 (Covid-19) आजार होण्यापासून वाचू शकतो. आपली रोगप्रतिकार शक्ती कमजोर असेल तर या विषाणूचा सामना करणं शक्य नाही. त्याकरता लसही (Corona Vaccine) उपलब्ध झाली आहे आणि तोच त्यावर सर्वोत्तम उपाय आहे; पण प्रत्येकाला ती मिळेपर्यंत काही कालावधी जाणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या सुरक्षेसाठी मास्क (Mask) वापरणे, योग्य शारीरिक अंतर (Social Distancing) ठेवणं आदी नियम पाळणंही आवश्यक आहे. त्याचवेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आहार आणि जीवनशैलीद्वारेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. त्यामुळे यासाठी विविध उपाय सांगितले जात आहेत. असाच एक साधा सोपा उपाय तज्ज्ञांनी सुचवला आहे. जो प्रत्येकाला अगदी घरच्या घरी सहजपणे करणं शक्य आहे. हा उपाय म्हणजे आपल्या रोजच्या चहामध्ये (Immunity booster Tea) दोन औषधी गोष्टी मिसळून त्या चहाचं सेवन करणं. हे वाचा - रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे, कोलेस्ट्रॉल आणि वजनही होईल कमी खरंतर या दोन्ही औषधी पूर्वापार आपण वापरत आलो आहोत. आयुर्वेदात (Ayurveda) याचं महत्त्व सांगितलं आहे. घरच्या घरी केल्या जाणाऱ्या औषधोपचारात याचा समावेश असतो. त्यामुळं आजीबाईच्या बटव्यातील या औषधी भारतीय स्वयंपाकघरात नेहमीच असतात. सर्दी, खोकला झाला तर आपण काढा करतो त्यातही या गोष्टी वापरतो. त्यामुळे या गोष्टी नव्या नाहीत; पण कोरोनामुळे त्याचं महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बहुतांश प्रत्येक व्यक्तीची सकाळ चहानंच सुरू होते. याच चहात आपल्याला फक्त दोन गोष्टी घालायच्या आहेत, त्यासुद्धा आपल्या घरातील. चहा बनवतानाच त्यात एक चिमूटभर ज्येष्ठमध पावडर (Licorice Powder) आणि एक- दोन लवंगा (Clove) टाकायच्या आहेत. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. हे वाचा - शरीरात हिमोग्लोबिन कमी झालंय; घाबरू नका हे सात पदार्थ खायला सुरुवात करा ज्येष्ठमधात अँटीव्हायरल (Anti Viral) गुणधर्म असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. तसंच यात अँटीऑक्सिडंटसही (Anti Oxidants) मोठ्या प्रमाणात असल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करणाऱ्या घटकांचा ते नाश करतात. घशातील खवखव, कफ, खोकला, सर्दी, श्वसन यंत्रणेतील इन्फेक्शनही होण्यापासून बचाव होतो. लवंगेतही रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे या दोन्ही आयुर्वेदिक औषधींचा वापर आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो. तेव्हा कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा तेही रोजच्या चहातून.
First published:

Tags: Health, Health Tips, Immun, Lifestyle, Tea, Wellness

पुढील बातम्या