जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अजबच आहे! वर्षभरापूर्वी झाला बॉयफ्रेंडचा मृत्यू; त्याच्या मृतदेहातून स्पर्म घेऊन प्रेग्नंट झाली गर्लफ्रेंड

अजबच आहे! वर्षभरापूर्वी झाला बॉयफ्रेंडचा मृत्यू; त्याच्या मृतदेहातून स्पर्म घेऊन प्रेग्नंट झाली गर्लफ्रेंड

अजबच आहे! वर्षभरापूर्वी झाला बॉयफ्रेंडचा मृत्यू; त्याच्या मृतदेहातून स्पर्म घेऊन प्रेग्नंट झाली गर्लफ्रेंड

प्रियकराच्या बाळाची आई होण्याचं तिचं स्वप्न त्याच्या मृत्यूनंतर एका वर्षाने पूर्ण होत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    कॅनबेरा, 30 जून:  प्रेग्नन्सी (Pregnancy) म्हणजे पुरुष आणि महिला यांचे शारीरिक संबंध व्हावे लागतात किंवा आयव्हीएफमार्फतही (IVF) प्रेग्नंट होता येतं. पण कोणत्या मृतदेहामधील स्पर्मपासून एखादी महिला प्रेग्नंट झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? ऑस्ट्रेलियातील एक महिला आपल्या मृत बॉयफ्रेंडच्या मृतदेहातील स्पर्म काढून प्रेग्नंट झाली (Girlfriend retrieved sperm from boyfriend dead body) आहे. जागतिक स्नोबोर्ड चॅम्पियनशिपचा (World Snowboard Championship) किताब दोन वेळा जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा विंटर ऑलिम्पियन अॅलेक्स पुलिन (Alex Pulin) गेल्या वर्षी एका दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. मात्र त्याच्या प्रेयसीने त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या बाळाची आई होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास सोडला नाही. त्याच्या मृत्यूनंतर 24 तासांच्या आत त्याचे शुक्राणू (Sperm) तिने मिळवले. त्यानंतर IVF तंत्रज्ञानाच्या साह्याने त्या शुक्राणूंचा वापर करून ती गर्भवतीही राहिली. प्रियकराच्या बाळाची आई होण्याचं तिचं स्वप्न त्याच्या मृत्यूनंतर एका वर्षाने पूर्ण होत आहे. हे वाचा -  आता हे कसं करायचं सांगा! रोमान्सवेळी GF च्या विचित्र हट्टामुळे BF ला आलं टेन्शन जुलै 2020 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या (Australia) एका भीषण अपघातात अॅलेक्स पुलिन याचा मृत्यू झाला. तो जवळपास आठ वर्षांपासून अॅलिडे व्लुग हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये (Relationship) होता. अॅलिडेच्या इच्छेनुसार डॉक्टर्सनी अॅलेक्सचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरातून निरोगी शुक्राणू काढून घेण्यात यश मिळवलं होतं. अॅलिडे हिने आपण गर्भवती असल्याचं वृत्त अलीकडेच इन्स्टाग्रामवरून जाहीर केलं आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे, ‘आमचं बाळ ऑक्टोबर महिन्यात जन्म घेणार आहे. मी आणि अॅलेक्स मागील काही वर्षांपासून बाळ जन्माला घालण्यासाठी नियोजन करत होतो. मधला काळ माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होता.’ ‘सेव्हन न्यूज’शी बोलताना अॅलिडेने सांगितलं, ‘आम्ही दोघंही मूल होण्यासाठी बराच काळ नियोजन करत होतो. यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही विचार करत होतो. माझ्या मनात सध्या संमिश्र भावना आहेत. असं काही होईल, याचा विचार आम्ही कधीच केला नव्हता. मागच्या एका वर्षात माझ्या जीवनात ज्या घटना घडल्या आहेत, त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मला अॅलेक्सची खूप आठवण येते. परंतु, त्याचं मूल माझ्याकडे आहे आणि तीच माझ्यासाठी सर्वांत मोठी भेट आहे.’ हे वाचा -  अन्ननलिका जाळून काढली; रिमोटची बॅटरी गिळताच तासाभराने गेला चिमुकलीचा जीव ‘क्वीन्सलँड शहरातल्या कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युपश्चात 36 तासांच्या आत त्याचे शुक्राणू काढून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे त्या नियमानुसार हे करण्याचा निर्णय घेतला. अॅलेक्सचे आई-वडीलही त्यादरम्यान ऑस्ट्रेलियात होते. आज मी माझी ही गोष्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर करतेय, यावर माझा विश्वास बसत नाही,’ असंही अॅलिडेनं सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात