नवी दिल्ली, 28 मे : ऑफिसमध्ये रुजू होताच वजन वाढण्याची समस्या काही लोकांमध्ये दिसून येते. तासनतास काम केल्यामुळे शरीराचा आकार बदलू लागतो. ही एक सर्वसामान्य समस्या आहे, जी बहुतेक लोकांना त्रास देते. ऑफिसमध्ये तासनतास काम करणं आणि घाईघाईत खाणं हे यामागचं सर्वात मोठं कारण मानलं (Office Weight Gain Reason) जातं.
हेल्थलाईनच्या माहितीनुसार, तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होत नाहीत आणि त्या जमा झाल्यामुळे त्यांचे फॅटमध्ये रूपांतर होते. त्यामुळे आपल्या शरीरावर लठ्ठपणा दिसू लागतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या ऑफिसमधील काही सवयी सोडल्या किंवा काही नवीन सवयी अंगिकारल्या तर आपण लठ्ठपणापासून बचाव करू शकतो. जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे आपले ऑफिसमध्ये वजन वाढते.
ऑफिसमध्ये वजन वाढण्याची कारणे
जंक फूड खाणे -
डेस्कवर कामात व्यग्र असल्यामुळे अनेक वेळा लोक चिप्स, फ्राईज, कुकीज, सँडविच, बर्गर असे जंक फूड खातात. त्यामुळे शरीरात कॅलरीज वाढू लागतात आणि लठ्ठपणा वाढू शकतो.
योग्य वेळी न खाणे
ऑफिसच्या कामात व्यग्र असल्यामुळे लोक अनेकदा जेवण टाळतात. त्यामुळे दुपारच्या जेवणाची वेळ दररोज बदलते. त्यामुळेही वजन वाढण्याची समस्या लोकांमध्ये दिसून येते. इतकेच नाही तर यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या देखील होऊ शकतात.
गडबडीत खाणे -
अनेकदा काम उरकण्याच्या घाईत आपण गडबडीत अन्न खातो. असे केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊन लठ्ठपणा वाढण्याची समस्या सुरू होते.
डेस्कला चिकटून राहणे -
तासनतास एकाच जागी बसून राहिल्यास तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होणार नाहीत आणि वजन वाढतच जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही दर तासाला थोडेसे हालचाल करत राहणे आणि शरीर सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे.
हे वाचा - टक्कल पडलेल्यांसाठी आशेचा किरण! या औषधामुळे सहा महिन्यात पुन्हा उगवणार केस
सूर्यप्रकाशाचा अभाव -
जर तुम्हाला जास्त वेळ सूर्यप्रकाश मिळत नसेल तर त्यामुळे आपल्या शरीराची सर्केडियन लय अनियंत्रित होते आणि वजन वाढू लागते. त्यामुळे मधल्या काळात बाल्कनीत किंवा ऑफिसच्या त्या भागात जा, जिथे सूर्यप्रकाश पडतो.
हे वाचा - फेस पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा असा करा उपयोग, स्कीन होईल ग्लोइंग
तणाव हे कारण आहे -
ऑफिसमध्ये कामाचा ताण बराच काळ राहतो, त्यामुळे हेही तुमचे वजन वाढण्याचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत तुमचे काम वेळेवर पूर्ण करा आणि तणावाला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Weight, Weight gain, Weight loss tips