Home /News /lifestyle /

Panic Day 2022: पॅनिक अटॅक म्हणजे नेमकं काय असतं? या कारणांमुळे तो कोणालाही येऊ शकतो

Panic Day 2022: पॅनिक अटॅक म्हणजे नेमकं काय असतं? या कारणांमुळे तो कोणालाही येऊ शकतो

Panic Day 2022: पॅनिक डे हा लोकांना त्यांच्या आयुष्यातील भीती, तणाव (Stress) कमी करण्यासाठी जागरूक करण्याचा दिवस आहे. घाबरणं (Panic) म्हणजे मानवी जीवनातील सर्वात वाईट स्थिती असते. आपण दुःखी, कठीण आणि भयावह परिस्थितीत घाबरतो.

    नवी दिल्ली, 09 मार्च : आपल्याला अचानक भीती (Panic) वाटत असेल, चिंता वाटत असेल तर हा पॅनिक अटॅकचा (Panic attack) प्रकार असू शकतो. पॅनीक अटॅक ही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानक भीती, अस्वस्थता, चिंता वाटू लागते. पॅनिक डे 2022 (Panic Day 2022) दरवर्षी 9 मार्च रोजी साजरा केला जातो. पॅनिक डे हा लोकांना त्यांच्या आयुष्यातील भीती, तणाव (Stress) कमी करण्यासाठी जागरूक करण्याचा दिवस आहे. घाबरणं (Panic) म्हणजे मानवी जीवनातील सर्वात वाईट स्थिती असते. आपण दुःखी, कठीण आणि भयावह परिस्थितीत घाबरतो. तणावपूर्ण परिस्थितीत घाबरू नये म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करणे आणि दीर्घ श्वास घेणे महत्त्वाचे आहे. पॅनिक अटॅक म्हणजे काय शारदा हॉस्पिटल (ग्रेटर नोएडा) येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रुती शर्मा म्हणतात की, पॅनीक अटॅकमध्ये पॅनीकचे भाग असतात. यामध्ये त्या व्यक्तीला असे वाटते की, त्याचे हृदय खूप जोरात धडधडत आहे. आता आपण मरतो की काय असे वाटणे. पॅनिक अटॅक हा एक मानसिक आजार आहे, ज्याची लक्षणे शारीरिक असली तरी कारणे मानसिक असतात. ताणतणाव असला किंवा नसला तरीही पॅनिक अटॅकचा झटका येऊ शकतो. असा पॅनिक अटॅक सहसा 15 ते 30 मिनिटे राहतो आणि नंतर हळूहळू नाहीसा होतो. हा प्रकार एकदा होऊन घेल्यानंतर माणसाला असे वाटू लागते की आता परत दुसऱ्यांदा असं झालं तर आपला जीव जाईल. यामुळे व्यक्ती खूप घाबरतो. ही समस्या अनेकांना होऊ शकते. पॅनिक अटॅकची लक्षणे डॉ. श्रुती शर्मा म्हणतात की पॅनीक अटॅकसाठी सेरोटोनिन मुख्यतः न्यूरोट्रांसमीटरमध्ये जाते. पॅनीक अटॅकची शारीरिक लक्षणे नॉरपेनेफ्रिन (Norepinephrine) आणि एड्रेनालाईन (Adrenaline) निर्माण होतात. ती पुढीलप्रमाणे दिसू शकतात- हृदय जोर-जोरात धडधडत राहणे धाप लागणे किंवा श्वास घेताना त्रास होणं भीती वाटणं हातपाय थरथरणे चक्कर येणं मळमळणे हात आणि पाय सुन्न होणे संपूर्ण अंगभर घाम येणे हे वाचा - वाइन पिणं Type-2 Diabetes मध्ये फायदेशीर ठरतं? संशोधनातून समोर आली ही माहिती पॅनिक अटॅकचे कारण दीर्घकाळ असलेला मानसिक ताण हे पॅनिक अटॅकचे प्रमुख कारण आहे. आपण बऱ्याच काळापासून कोणत्याही समस्येशी झुंज देत असाल, तर त्यामुळे पॅनिक अटॅक येवू शकतो. मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाच्या रसायनाच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवते. पॅनिक अटॅकवरील उपचार पॅनिक अटॅकच्या उपचारामध्ये सेरोटोनिन रसायन स्थिर करणे गरज असते. त्याचा उपचार 3 ते 6 महिन्यांचा असतो. यावर मानसोपचाराद्वारेही उपचार केले जातात. औषधांसोबत मानसोपचार दिल्यास लवकर फायदा होतो. याव्यतिरिक्त, पॅनीक अटॅकवर देखील एन्टीडिप्रेसंट्स आणि अँटी-एंझाईटी औषधांनी उपचार केले जातात, जे कालांतराने न्यूरोट्रांसमीटर स्थिर करतात. यामुळे हळूहळू पानिट अटॅकची समस्या कमी होते. हे वाचा - 2 मुलांची आई.. PCOS चाही त्रास; तरी महिलेनं घटवलं तब्बल 30 किलो वजन तणावामुळे पॅनीक अटॅक वाढतो तणाव आरोग्यासाठी हानिकारक आहे. तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. उपचार न केल्यास तणाव धोकादायक ठरू शकतो. तणावामुळे पॅनीक अटॅक तसेच हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारखे आजार होऊ शकतात. जर तुम्हाला तणाव, नैराश्य, चिंता इत्यादी समस्या असतील तर त्यावर त्वरित उपचार करा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Stress

    पुढील बातम्या