नवी दिल्ली, 09 मार्च : रात्रीच्या जेवणासोबत थोडी वाइन (Wine) प्यायल्यास टाईप-2 मधुमेह (Type-2 Diabetes) होण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आलीय. scitechdaily मध्ये दिलेल्या अहवालानुसार, अल्कोहोलचं (Alcohol) सेवन करणार्या सुमारे 3 लाख 12 हजार लोकांच्या अभ्यासात असं दिसून आलंय की, मध्यम प्रमाणात मद्यपान (महिलांसाठी दररोज 14 ग्रॅम आणि पुरुषांसाठी 28 ग्रॅमपेक्षा जास्त नाही) टाईप-2 मधुमेह होण्याचा धोका कमी करतं. वाइनच्या (Wine) सेवनानं हा फायदा मिळत असल्याचं अभ्यासात दिसून आलंय. मात्र, यातही टाइप-2 मधुमेहाचा धोका केवळ जेवणासोबत वाइन घेतली जाते, तेव्हाच कमी होतो, अन्यथा होत नाही असंही दिसून (Benefits of wine) आलंय. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एपिडेमियोलॉजी, प्रिव्हेन्शन, लाइफस्टाइल आणि कार्डिओमेटाबॉलिक हेल्थ कॉन्फरन्स 2022 मध्ये सादर केल्या जाणाऱ्या प्राथमिक संशोधनानुसार सध्या अंदाजे 3 लाख 12 हजार 400 मद्यपान करणाऱ्यांच्या आरोग्याविषयीच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये मद्यसेवन, विशेषत: वाइन सेवनावरील अभ्यास (Study on Wine Consumption) झाला. यात कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांच्या सेवनाचा टाईप-2 मधुमेहाशी कशा प्रकारे संबंध आहे, याच्याशी संबंधित संशोधन करण्यात आलं. हे वाचा - केसांवर घरगुती उपाय करताना तुम्हीही अशी चूक करत नाही ना?कोंड्यानं डोकं भरून जाईल अभ्यासात असं म्हटलंय की, केवळ मध्यम प्रमाणात वाइन पिणंच टाइप-2 मधुमेहावर सकारात्मक परिणाम करतं. महिलांसाठी दररोज एक ग्लास आणि पुरुषांसाठी दररोज दोन ग्लास वाइन घेणं पुरेसे आहे. सरासरी 11 वर्षांच्या अभ्यासात, अभ्यासातील सुमारे 8,600 प्रौढांना टाइप 2 मधुमेह झाला. अन्नासोबत वाइन घेतल्यास टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका अन्नाशिवाय वाइन घेण्यापेक्षा 14 टक्के कमी होता. जेवणासोबत वाईन पिणं आणि टाइप 2 मधुमेह यांच्यातील संबंध वाइन आणि इतर प्रकारचे अल्कोहोल पिणाऱ्या सहभागींमध्ये सर्वात सामान्य होते. हे वाचा - Almond oil: दोन थेंब बदाम तेल चेहऱ्यावर आणेल जबरदस्त ग्लो; फक्त असा करा वापर वाइन पिण्याचे फायदे आहेत? अनेक संशोधनातून असं दिसून आलंय की, एक ग्लास रेड वाईन पिणं आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आयुर्मान वाढू शकते. हृदयविकारांपासूनही रक्षण होऊ शकते. हानिकारक दाह कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे, रेड वाईनमध्ये पांढऱ्या वाइनपेक्षा जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.