जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Muskmelon in Summer: उन्हाळ्यात मिळणारं हे फळ नक्की खा, किडनीपासून हृदयापर्यंत इतके आहेत फायदे

Muskmelon in Summer: उन्हाळ्यात मिळणारं हे फळ नक्की खा, किडनीपासून हृदयापर्यंत इतके आहेत फायदे

Muskmelon in Summer: उन्हाळ्यात मिळणारं हे फळ नक्की खा, किडनीपासून हृदयापर्यंत इतके आहेत फायदे

Muskmelon Health Benefits : खरबूज उन्हाळ्यात मिळणारे हंगामी फळ आहे, जे प्रत्येकाला खायला आवडते. हे फळ 97 टक्के पाण्याने भरलेले असते, यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 एप्रिल : उन्हाळ्यात (Summer) फळांचा राजा आंब्याची बहुतेक लोक आतुरतेने वाट पाहत असले तरी आरोग्याच्या फायद्यांवर (Health Benefits) नजर टाकली तर खरबूज (Muskmelon) सुद्धा या ऋतूत सुपरफूडपेक्षा कमी नाही. खरबूज उन्हाळ्यात मिळणारे हंगामी फळ आहे, जे प्रत्येकाला खायला आवडते. हे फळ 97 टक्के पाण्याने भरलेले असते, यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. हेल्थलाइननुसार, खरबूजमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आढळतात. शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास हे फळ उपयोगी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खरबुज खाण्याचे फायदे जाणून (Muskmelon Benefits in summer ) घेऊयात. खरबूजचे फायदे प्रतिकारशक्ती वाढते खरबूजमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. यामुळे आपण संसर्ग आणि रोगापासून वाचू शकतो. वजन कमी खरबूजमध्ये पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतं. यामुळं शरीर हायड्रेट राहतं आणि आतडे स्वच्छ ठेवण्याचे काम आपोआप होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हृदयासाठी फायदेशीर खरबुजात आढळणारा एडेनोसिन नावाचा घटक शरीरातील रक्त पातळ करतो, त्यामुळे रक्त घट्ट होत नाही आणि हृदयविकाराचा धोका टळतो. बद्धकोष्ठता खरबुजात पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. हे वाचा -  सूर्यदेव उच्च राशीत करताहेत प्रवेश; एप्रिलच्या मध्यात या लोकांचं भाग्य उजळणार डोळ्यांसाठी फायदेशीर यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आढळतात. हे दोन्ही घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. किडनीसाठी फायदेशीर खरबुजात पाणी मुबलक प्रमाणात आढळते आणि ऑक्सिजन मिळतो त्यामुळे किडनीमध्ये मुतखड्याचा त्रास होत नाही आणि ते सहज फ्लश होत राहतं. हे वाचा -  देशात 60% अकाली मृत्यूंचं कारण बनू शकतो चुकीचा आहार; NIN कडून धक्कादायक माहिती मधुमेहामध्ये खरबूज खा खरबूज चवीला गोड असला तरी त्यात साखरेचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेले लोकही ते खाऊ शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात