नवी दिल्ली, 06 एप्रिल : झपाट्याने बदलणाऱ्या जगाच्या खाद्यपदार्थांचे मानके बदलण्याची वेळ आली आहे. बदलत्या काळानुसार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे देशातील 60 टक्के अकाली मृत्यूचे कारण बनू शकते. ही बाब लक्षात घेऊन तेलंगणाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) कडून आहाराच्या सवयींचा एक नवीन मसुदा तयार केला जाणार आहे. ज्यामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसाठी योग्य आहाराची नवीन मानके निश्चित केली जातील. पुढील तीस वर्षे खूप महत्त्वाची हिंदुस्थान टाईम्स ने दिलेल्या बातमीनुसार, येत्या 30 वर्षांत देशातील प्रौढ लोकसंख्या आठ टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे खाद्यपदार्थांची मागणी झपाट्याने वाढेल. पौष्टिक आहाराच्या अभावी, रोगांचा प्रादुर्भाव होईल, जे अकाली मृत्यूचे प्रमुख कारण बनू शकते. NIN ची तयारी: - एनआयएनने 560 खाद्यपदार्थांचे नमुने तपासले आहेत. - चाचणी दरम्यान 140 पोषण घटकांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. - 06 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहाराची नवीन मानके तयार केली जातील. देशातील परिस्थिती: 15 ते 49 वयोगटातील 53 टक्के महिला पौष्टिक आहारापासून वंचित आहेत. 0 ते 5 महिने वयोगटातील 34.7 टक्के मुले सदृढ नाहीत. 0 ते 5 वर्षांच्या 17.3 टक्के मुलांना पोषक आहार मिळत नाही. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 32 टक्के वृद्धांना पौष्टिक आहार मिळत नाही (स्रोत: ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट) खराब आहाराचा जीडीपीवर परिणाम - कुपोषण वाढल्याने जीडीपी 2 ते 3 टक्क्यांनी घसरतो. - कुपोषणाच्या विळख्यात असलेल्या व्यक्तीचे उत्पन्न 10 टक्क्यांनी कमी होते - देशातील 60 कोटी लोकांना नेहमी थकवा आणि अशक्तपणाचा त्रास असतो. खराब आहाराचा जगावर होतो असा परिणाम - - जगभरात दरवर्षी सरासरी 1.9 कोटी लोकांचा मृत्यू होतो. - 22 टक्के तरुणांच्या मृत्यूचे कारण हृदयविकार आहे. - 50 टक्के मृत्यू हे अन्नधान्य, फळे कमी खाल्ल्यामुळे आणि अन्नपदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण वाढल्यामुळे होतात. - 36 टक्के मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात लाल मांस, गोड पदार्थांचे सेवन. (स्रोत: वॉशिंग्टन विद्यापीठ) हे वाचा - हाडांच्या दुखण्याला संधीवात समजण्याची चूक करू नका; हा गंभीर आजार झालेला असू शकतो खराब आहार आणि मृत्यू देशातील मृत्यू इजिप्त - 552 चीन - 350 भारत - 310 यूके - 127 अमेरिका - 171 स्रोत: (लॅन्सेट: 2017 प्रति एक लाख लोकसंख्येपाठीमागे) हे वाचा - Weight Loss : पोटॅशियमनं समृद्ध या पदार्थांचा आहारातील समावेश झटपट करेल वजन कमी आरोग्याचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट पौष्टिक आहारामुळे अनेक गंभीर आजार टाळता येतात, असे एनआयएनचे संचालक डॉ. अवुला यांचे म्हणणे आहे. अलिकडच्या काळात चरबीयुक्त आणि साखरेचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आजार वाढत आहेत. हे लक्षात घेऊन अन्नाचा नवा मसुदा तयार करण्याचा विचार सुरू आहे, जेणेकरून मानवी आरोग्याचे रक्षण करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.