शुक्राच्या बदलामुळे मेष, मिथुन, सिंह, धनु आणि मकर या पाच राशींसाठी हा बदल खूप खास आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे या पाच राशींना सुखाची सर्व साधने मिळतील.
या राशी बदलामुळे या राशींना धन, सुख, संपत्ती, दागिने, घर इत्यादी सर्व काही मिळेल. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभेल.
शुक्र 23 मे रोजी राशी बदलून मेष राशीत आला आहे. काही राशींना शुक्राचे शुभ संकेत मिळत असले तरी काही राशींसाठी अशुभ संकेतही दिसणार आहेत.
काही राशीच्या लोकांना या परिवर्तनामुळे खूप खर्च करावा लागू शकतो. वृषभ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार नाही.
याशिवाय कर्क, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे शुक्राचे परिवर्तन शुभ नाही. शुक्रामुळे त्यांच्या आनंदात विरजन पडणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सावध राहावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)