मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Post Covid-19: पोस्ट कोविड आजार नंतर जीवघेणे ठरू शकतात, अगोदरपासून घ्या अशी काळजी

Post Covid-19: पोस्ट कोविड आजार नंतर जीवघेणे ठरू शकतात, अगोदरपासून घ्या अशी काळजी

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविडमधून (covid) बरे झालेल्या लोकांचा सहा महिन्यांत मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी त्यांनी...

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविडमधून (covid) बरे झालेल्या लोकांचा सहा महिन्यांत मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी त्यांनी...

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविडमधून (covid) बरे झालेल्या लोकांचा सहा महिन्यांत मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी त्यांनी...

नवी दिल्ली, 11 मे : कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर जे या साथीच्या आजारातून वाचले आहेत, त्यांना माहीत आहे की बरे झाल्यानंतर समस्या संपत नाहीत. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये कोविड नंतरच्या गुंतागुंतीची असंख्य उदाहरणे आहेत. हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि मेंदूचा झटका या काही गुंतागुंत आहेत, ज्या या व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर उद्भवू शकतात. दरम्यान, नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविडमधून बरे झालेल्या लोकांचा सहा महिन्यांत मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या आणखी एका अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविड-19 ची सौम्य लक्षणं असणाऱ्यांचाही त्याच कालावधीत (6 महिन्यांत) मृत्यू होऊ (Post Covid-19 Health Problems) शकतो.

हे स्पष्ट आहे की जे लोक दीर्घकाळ कोरोनाचा त्रास सहन केल्यानंतर बरे होतात त्यांना किडनी आणि हृदयविकार, रक्ताच्या गुठळ्या आणि ब्रेन स्ट्रोक यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.

पोस्ट कोविड रोग -

हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीत, डॉ चारूदत्त अरोरा, सल्लागार फिजिशियन, एशियन हॉस्पिटल, फरीदाबाद, स्पष्ट करतात, “कोविड-19 च्या दीर्घकालीन गुंतागुंतीमुळे गंभीर आजार किंवा मृत्यू होऊ शकतो. यूएसमध्ये 2020-21 या वर्षात केलेल्या अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, रक्तवहिन्यासंबंधी प्रणाली, हृदय-श्वसन प्रणाली आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीमुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

कोविड-19 हा श्वसनाचा आजार शरीराच्या इतर भागांवर कसा परिणाम करू शकतो, याबद्दल विशद करताना डॉक्टर म्हणाले, “सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, रक्ताच्या गुठळ्या विकसित होणे आणि रक्तवहिन्यासंबंधीचा दाह वाढणे यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका, वीनस थ्रॉम्बोसिस आणि स्ट्रोक येऊ शकतो." यकृत खराब होणे, श्वसनक्रिया बंद होणे आणि हृदयविकाराचा झटका हे काही आजार कोविडमधून वाचलेल्यांच्या मृत्यूचे कारण ठरू शकतात.

हे वाचा - टेन्शन नॉट! आता आंबे खरेदी करताना होणार नाही फसवणूक; या 2 गोष्टी ध्यानात ठेवा

प्रतिबंधात्मक उपाय -

कोरोनानंतर आपल्याला कोणताही वेगळा आजार झालेला नाही, याची खात्री करण्‍यासाठी आहाराचे आणि आरोग्‍य मापदंडांचे निरीक्षण करणे आवश्‍यक आहे. शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे दुर्लक्ष केल्यानं एखाद्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो.

हे वाचा - प्रवासात उलटीचा त्रास होईलच कसा? या 3 गोष्टी तुमचं टेन्शन घालवतील

डॉ चारू म्हणाले. “कोविडनंतरच्या सर्व रुग्णांसाठी भरपूर फायबर आणि फ्लूड सोबत संतुलित आहार आवश्यक आहे. श्वासोच्छवासाची अचानक होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे, संसर्ग नियंत्रण उपायांचे पालन करणे आणि फिजिओथेरपिस्टकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona updates, Covid19, Health