नवी दिल्ली, 07 मार्च : केस मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी हेअर मास्कमध्ये (Hair Mask) अनेकजण अंडी (Egg) मिसळतात. परंतु, यासाठी तुम्हाला अंड्याचा वापर करण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वारंवार केसांवर चुकीच्या पद्धतीने अंडी वापरत असाल तर त्यामुळे चांगले परिणाम दिसण्याऐवजी उलट नुकसान (Hair Care Tips) होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, अंडी सर्व प्रकारच्या केसांवर लावली जाऊ शकतात, परंतु जर तुम्ही त्याचा सतत वापर केला तर केस गळू शकतात. अंडी चुकीच्या पद्धतीने लावल्याने केसांमध्ये कोंडा भरतो. जर तुम्हीही हेअर मास्कमध्ये अंड्यांचा वापर करत असाल तर जाणून घ्या ते वापरण्याची योग्य पद्धत.
अंडी वापरण्याची योग्य पद्धत
याच्याशी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंड्याचा पिवळा भाग सर्व प्रकारच्या केसांना उपयोगी नाही.
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार अंड्याचा पिवळा भाग फक्त कोरड्या केसांवरच लावावा. त्याच वेळी, अंड्याचा पांढरा भाग नॉर्मल आणि तेलकट केसांसाठी योग्य आहे. जर तुमचे केस तेलकट असतील तर तुम्ही केसांमध्ये अंड्याचा पांढरा भागच लावावा. हेअर मास्कमध्ये एग योक वापरल्याने केसांमधील कोंड्याची समस्या वाढू शकते.
हे वाचा -
Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?
हे तोटे आहेत
प्रथिनांच्या व्यतिरिक्त, अंड्यांमध्ये अनेक खनिजे देखील असतात. अंड्यातील पिवळा भाग केसांना भरपूर तेल आणि आर्द्रता देतो. जेव्हा हे तेल तेलकट केसांमध्ये आधीपासून असलेल्या तेलात मिसळते तेव्हा टाळूमध्ये तेलाचे प्रमाण खूप वाढते. यामुळे जिवाणू संसर्ग, डोक्यातील कोंडा आणि डोक्यात खाज सुटते. बुरशीजन्य संसर्गामुळे कोंडा होतो. अंड्यातील पिवळा भाग तेलकट केसांमध्ये जास्त वापरल्यास कोंड्याची समस्या वाढते. त्यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.
हे वाचा -
लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
या प्रकारच्या केसांमध्ये सतत वापर नको
तेलकट केसांमध्ये अंड्यांचा जास्त वापर केल्याने केसांना उग्र वास येतो. हा वास इतका तीव्र असतो की शॅम्पू केल्यानंतरही तो जात नाही. हा तीव्र वास तुम्हाला चार-चौघात त्रासदायक ठरू शकतो, म्हणून अंडी जास्त वापरू नका.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.