मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Chia Seeds: वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा असा करा वापर; आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

Chia Seeds: वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा असा करा वापर; आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

जर रोजच्या आहारात 30 ग्रॅम फायबरचा समावेश केला तर वजन कमी करण्यात खूप मदत होते. एवढेच नाही तर 2 चमचे चिया बियांमध्ये 4.7 ग्रॅम प्रथिने देखील आढळतात. जाणून घेऊया चिया सीड्सचे (Chia Seeds For Weight Loss) फायदे.

मुंबई, 04 जून : चिया सीड्स असा एक आहार आहे, जो आता सुपरफूड म्हणून ओळखला जातो. वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक लोक त्याचा आहारात समावेश करत आहेत. हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, चिया बियांचे सेवन करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. यात भरपूर फायबर आणि प्रथिने असतात, त्यामुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते आणि वारंवार अन्नाची तृष्णा होत नाही. चिया बियांच्या दोन चमचांमध्ये 10 ग्रॅम फायबर आढळते, जे दररोजच्या सेवनाच्या 40 टक्के आहे. संशोधनानुसार, जर रोजच्या आहारात 30 ग्रॅम फायबरचा समावेश केला तर वजन कमी करण्यात खूप मदत होते. एवढेच नाही तर 2 चमचे चिया बियांमध्ये 4.7 ग्रॅम प्रथिने देखील आढळतात. जाणून घेऊया चिया सीड्सचे (Chia Seeds For Weight Loss) फायदे.

चिया बियांचे इतर फायदे कोणते?

चिया बियांमध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू (मसल्स) मजबूत तयार होण्यास मदत होते.

चिया बियांमध्ये भरपूर फायबर असते आणि ते पचनक्रिया चांगले ठेवतात.

चिया बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड किंवा ALA ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते, जे हृदय चांगले ठेवते.

चिया बिया कशा वापराव्या -

आपण दिवसाच्या कोणत्याही वेळी चिया बिया खाऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी, नाश्त्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी ते खा.

दिवसभरात 2 चमचेपेक्षा जास्त सेवन करू नये.

जर तुम्ही चिया बियांचे सेवन करत असाल तर भरपूर पाणी प्या.

हे वाचा - Netflix चा पासवर्ड शेअर करणं पडेल महागात; कंपनीकडून नवी घोषणा

या गोष्टींमध्ये चिया बिया वापरा -

smoothies

ओट्स

सॅलड/ कोशिंबीर

सॅलड ड्रेसिंग

दही

सूप किंवा ग्रेव्ही

मफिन्स

घरगुती ब्रेड

पोच किंवा आमलेट

चिया पुडिंग

हे वाचा -  घराचं बेसमेंट असं असायला हवं; बांधताना या 9 गोष्टींची काळजी घेतली की चिंता नाही

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही रक्तदाबाची औषधे घेत असाल किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर चिया बिया खाणे टाळा. ते तुमचे नुकसान करू शकते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips