नवी दिल्ली, 2 जून : ओटीटी प्लॅटफॉर्म्स (OTT Platforms) हे मनोरंजनाचं नवं साधन आहेत. कोरोना काळात चित्रपटगृहं, नाट्यगृहं बंद होती, त्यावेळी हे प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं (Entertainment) प्रमुख माध्यम बनलं. दिवसेंदिवस या ओटीटीची लोकप्रियता आणि प्लॅटफॉर्मची संख्या वाढत आहे. नेटफ्लिक्स (Netflix) हे त्यापैकीच एक होय. नेटफ्लिक्सवर दर्जेदार कंटेंट (Content) उपलब्ध असतो. तसंच तुमचा आवडता कंटेंट निवडण्याचं स्वातंत्र्यदेखील मिळतं. तुम्ही एका पासवर्डवर नेटफ्लिक्स टीव्ही, टॅब, स्मार्टफोनवर पाहू शकता.
तसंच मित्रांसोबत पासवर्ड शेअर (Password Share) करू शकता. मात्र, आता नेटफ्लिक्सकडून एक नवी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, तुम्ही इच्छा असूनही अन्य युजर्सशी नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करू शकणार नाही. कारण या सुविधेसाठी आता कंपनीकडून चार्जेस (Charges) आकारले जाणार आहेत. त्यामुळे ही बाब खर्चिक ठरू शकणार आहे. मात्र, भारतात (India) या धोरणाची (Policy) अंमलबजावणी केव्हापासून सुरू होणार याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
`झी बिझनेस हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सने मार्च महिन्यात आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तुम्ही नेटफ्लिक्सची मेंबरशिप (Membership) घेतली आणि नेटफ्लिक्स अकाउंटचा पासवर्ड आपल्या मित्रांसोबत शेअर करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. कारण जर तुम्ही तुमचं अकाउंट शेअर केलं तर नेटफ्लिक्स लोकांना अतिरिक्त पैसे भरण्यास सांगेल.
पासवर्ड शेअरिंग रोखण्यासाठी नेटफ्लिक्सने ही योजना आखली आहे. सध्या या योजनेची अंमलबजावणी केवळ पेरू (Peru), चिली (Chilli) आणि कोस्टा रिका (Costa Rica) या देशांमध्ये केली जात आहे. याचा अर्थ ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचं नवीन धोरण भारतासह इतर देशांमध्ये येणार नाही, असं नाही. कंपनी काही ठिकाणी याची चाचणी करत आहे. जेणेकरुन ते अधिकाधिक देशांमध्ये लागू करता येईल.
नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर कारवाई करण्यासाठी पेरू, चिली आणि कोस्टा रिका येथे चाचणी घेतली आहे. परंतु, पासवर्ड शेअरिंग थांबवण्याचा कंपनीचा हा प्रयत्न ज्याप्रकारे नियोजित होता त्याप्रमाणे तो प्रत्यक्षात येताना दिसत नाही. ‘रेस्ट ऑफ वर्ल्ड’ च्या एका अहवालात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, नेटफ्लिक्स युजर्सना पॉलिसीचं उल्लंघन केल्याबद्दल अतिरिक्त पैसे देण्यास सांगत आहे. याचा अर्थ युजर्सनं त्यांचं नेटफ्लिक्स अकाउंट कुटुंबातल्या (Family) व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कुणाशीही शेअर करू नये, असा होतो. भारतात हे धोरण कधी लागू होईल, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Netflix, OTT