मुंबई, 19 डिसेंबर : निरोगी आयुष्यासाठी चांगली झोप (Sleep tips) खूप महत्त्वाची आहे. योग्य आहार आणि व्यायामाइतकीच चांगल्या आरोग्यासाठी झोप महत्त्वाची आहे (Food for sleep). चांगली झोप मिळाल्यानंतरच आपला मेंदू फ्रेश होतो आणि आपण आपली कामे अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. पुरेशी झोप न मिळाल्यास लठ्ठपणा, हृदयविकार, नैराश्य इत्यादींचा धोका वाढतो. याशिवाय शरीरातील पेशींचे कार्य बिघडण्याचा धोकाही निर्माण होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्तीही टिकून राहते, ज्यामुळे आपले शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते. मात्र, बदलती जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनामुळे अलिकडे लोकांना झोपेचा त्रास होऊ लागला आहे. आजकाल अनेकांना नीट झोप (food for better sleep) लागत नाही.
HTK च्या बातमीनुसार, UK मधील पाचपैकी एका व्यक्तीला रात्री चांगली झोप लागत नाही. ही स्थिती भारतामध्येही फारशी वेगळी नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने इतरही अनेक समस्या दिसू लागतात. अहवालानुसार, आहार आणि झोप यांचा चांगला संबंध आहे.
झोपेच्या गुणवत्तेवर अन्न आणि झोप यांच्यातील रसायनशास्त्राचा परिणाम होतो. आहारामुळे स्लीप हार्मोन मेलाटोनिनवर परिणाम होतो. ट्रिप्टोफॅन हे रासायनिक अमीनो अॅसिड असलेले झोपेसाठी मदत करते. कारण ट्रायप्टोफॅन हे स्लीप हार्मोन मेलाटोनिनच्या उत्पादनात मदत करते. तथापि, काही जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील झोप येण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
हे पदार्थ तुम्हाला चांगली झोप देतात
ऑईली मासे (Oily Fish)
ऑईली माशांचा आहारात समावेश केल्यास झोप चांगली लागते. कारण त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. जे सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतात. सेरोटोनिन मूड चांगला ठेवते आणि झोपेचे चक्र सुधारते.
हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी
चेरी
चेरीचा ज्यूस चांगली झोप लागण्यासाठी मदत करतो. हे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. अभ्यासानुसार, चेरी मेलाटोनिन हार्मोनची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे वृद्धांमध्येही झोप येण्यास मदत होते.
गरम दूध (Hot Milk)
अभ्यासानुसार, झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे हे उत्तम झोपेसाठी फायदेशीर पेय आहे. यामुळे चांगली शांत झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी आपण फ्रेश ताजेतवाणे होतो.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Lifestyle, Sleep, Sleep benefits