जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Almond Oil Benefits: दोन थेंब बदाम तेल चेहऱ्यावर आणेल जबरदस्त ग्लो; फक्त असा करा वापर

Almond Oil Benefits: दोन थेंब बदाम तेल चेहऱ्यावर आणेल जबरदस्त ग्लो; फक्त असा करा वापर

Almond Oil Benefits: दोन थेंब बदाम तेल चेहऱ्यावर आणेल जबरदस्त ग्लो; फक्त असा करा वापर

Almond Oil Benefits: पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेलं बदामाचं तेल (Almond Oil) चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्या कमी करून ग्लो टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याच्याविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 मार्च : चेहरा उजळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. परंतु, काहीवेळा काही त्वचेच्या समस्यांमुळं (Skin Problems) चेहऱ्याचं सौंदर्य हरवू लागतं. अनेक महागडी सौंदर्यप्रसाधनंही त्वचेच्या समस्यांवर कुचकामी ठरतात. अशी स्थिती असेल तर बदामाचं तेल त्वचेच्या सर्व समस्यांवर चांगला उपाय ठरू शकतं. पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेलं बदामाचं तेल (Almond Oil) चेहऱ्याशी संबंधित सर्व समस्या दूर करून ग्लो टिकवून ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. सर्वांनाच बदामाचे गुणधर्म (Almond Oil Benefits) माहीत असतात. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ए, ई, डी कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतं. बदामाच्या तेलाचा नियमित वापर करून, त्वचेच्या अनेक समस्या दूर करणं आणि त्वचा चमकदार आणि सुंदर बनवणं शक्य आहे. बदाम तेल कसं वापरावं? रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर बदामाचं तेल लावावं. यासाठी प्रथम हात आणि चेहरा धुवून कोरडा करावा. त्यानंतर बदामाच्या तेलाचे काही थेंब तळहातावर चोळा. त्यामुळं तेल थोडं कोमट होईल. त्यानंतर थोडा वेळ हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. जाणून घेऊ बदामाचं तेल अशा प्रकारे त्वचेवर लावण्यामुळं काय फायदे होतील. काळी वर्तुळं होतील गायब झोप न लागल्यानं किंवा अति ताणामुळं अनेक वेळा डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडू लागतात. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलात थोडंसं गुलाबपाणी किंवा मध घालावा. हे मिश्रण लावल्यास काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळते. हे वाचा -  दिवसा झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या झोपेविषयी माहिती सुरकुत्या नाहीशा होतील चेहऱ्यावरील सुरकुत्या हे वृद्धत्वाचं लक्षण आहे. यामुळं तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होऊ लागते. बदामाच्या तेलात खोबरेल तेल आणि कोरफड जेल घालून लावावं. याच्यामुळं सुरकुत्या आणि बारीक रेषाही दूर होतात. मेकअप काढण्यासाठी उपयुक्त बदामाचं तेल चेहऱ्यासाठी नैसर्गिक क्लींजर म्हणूनही काम करतं. याचा वापर मेकअप काढण्यासाठीही करता येतो. रात्री झोपण्यापूर्वी कापसात बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकून चेहरा स्वच्छ करा. हे वाचा -  उरलेले साबणाचे तुकडे वापरून असा बनवा हँडवॉश; सॅनिटायझरवर फुकटचा खर्चच नको मुरुमे आणि पुरळ घालवा जर तुम्ही चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ आल्याच्या समस्येनं त्रस्त असाल तर बदामाचं तेल तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतं. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल घटक मुरुम आणि पुरळ दूर करण्यास मदत करतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात