नवी दिल्ली, 02 मे : कोरोना महामारीच्या (Corona pandemic) काळात आणि इतर आजारांमध्ये प्रत्येकाने शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या संसर्ग, आजारांपासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल. उन्हाळ्यात सर्वत्र मिळणारे कलिंगड आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. कलिंगडासोबतच त्याच्या बियादेखील आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर (Benefits Of Eating Watermelon Seeds) आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.
रक्तदाब -
उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाणे फायदेशीर आहे. त्यामुळे उष्णतेचा शरीराला होणार त्रास खूप कमी होतो आणि आपल्याला फ्रेश वाटतं. रखरखत्या उन्हात सुद्धा कलिंगड खाल्ल्यानंतर थंडावा जाणवतो. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, आहारात टरबूजच्या बियांचा समावेश केल्यानं त्यातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करू शकतात. याशिवाय टरबूजाच्या बिया तुमच्या टिश्यू दुरुस्त करून स्नायूंना निरोगी बनवतात आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी सिद्ध होऊ शकतात.
हे वाचा - भूक मंदावण्याचा प्रॉब्लेम उन्हाळ्यात होतोच; हे 5 घरगुती उपाय भूक वाढवतील
हृदयाच्या समस्यांवर उपाय -
टरबूजाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तुम्हाला लवकरच थकवा जाणवू लागतो. अशा स्थितीत टरबूजाच्या बियाही खायला हव्या. याच्या मदतीने तुमच्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळू शकते. या बिया हिमोग्लोबिनसाठीही फायदेशीर आहेत.
हे वाचा - बापरे! जगातील सर्वांत महाग कलिंगड; एका कलिंगडाची किंमत तब्बल 4.5 लाख रुपये
लठ्ठपणावर फायदेशीर -
तुम्ही तुमच्या जादा वजन किंवा लठ्ठपणाच्या समस्येशी झगडत असल्यास, कमी कॅलरी असलेल्या टरबूजाचे बिया तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. टरबूजाच्या बियांचा फायदा घेण्यासाठी, तुम्ही त्यांना सॅलड, भाज्या किंवा स्नॅक्समध्ये समाविष्ट करू शकता आणि त्यांना रोजच्या आहाराचा एक भाग बनवू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fruit, Health, Health Tips