Home /News /lifestyle /

अचानक मेडिकल इमर्जन्सी कोणावरही येऊ शकते; गोंधळून न जाता या 3 गोष्टी शांतपणे करा

अचानक मेडिकल इमर्जन्सी कोणावरही येऊ शकते; गोंधळून न जाता या 3 गोष्टी शांतपणे करा

एखाद्याला हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, तीव्र छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर आपत्कालीन विभागात जाण्यास अजिबात संकोच करू नका. थेट तिथे पोहचा.

    नवी दिल्ली, 03 जून : वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळ सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. एखादी व्यक्ती रस्ता अपघातात बळी पडली असेल किंवा तिला हृदयविकाराचा झटका आला असेल, अशा वेळी वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले तर व्यक्तीचा जीव वाचू शकतो. ज्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज आहे, त्यांना रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात (Emergency Department) नेण्याची शिफारस डॉक्टर करतात. इमर्जन्सी वॉर्ड हा रुग्णालयातील इतर विभागांपेक्षा वेगळा आहे, कारण येथे 24 तास सेवा दिली जाते. सामान्यतः आपत्कालीन विभागात सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी उच्च प्रशिक्षित डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिक असतात. डॉक्टर आणि त्यांचे कर्मचारी त्यांचे काम व्यवस्थित करत असताना, आपणही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याविषयी जाणून घेऊया. आपत्कालीन विभागात कधी जायचे? तज्ज्ञांनी सुचवले आहे की, जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, तीव्र छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर आपत्कालीन विभागात जाण्यास अजिबात संकोच करू नका. थेट तिथे पोहचा. अपघातासारख्या प्रसंगी जेव्हा रुग्णाची चेतना हरवली जाते, तेव्हा त्याला शक्य तितक्या लवकर आपत्कालीन वॉर्डमध्ये हलवावे. या काळात सोबत असणाऱ्या घाबरून न जाता भावनिक विचार न करता वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करा. तसेच एखाद्याला ठराविक पदार्थाची किंवा औषधाच्या ओव्हरडोज किंवा विषाची अ‌ॅलर्जी असेल तर, लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे ठरते. गर्भधारणेची गुंतागुंत असलेल्या महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी आपत्कालीन वॉर्डमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. हे वाचा - विनायक चतुर्थीला अशा पद्धतीनं करा गणेशाची पूजा; सर्व आशा-आकांक्षा होतील पूर्ण डॉक्टरकडे जाण्यापूर्वी - आपत्कालीन परिस्थितीत बरेच लोक घाबरतात, परंतु तज्ज्ञ सुचवतात की, आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे. या काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला किंवा रुग्णाला शक्य तितके सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री होईल. आपत्कालीन विभागात जाण्यापूर्वी वाटेत रुग्णाच्या वैद्यकीय नोंदी घेण्याचा विचार करा, ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या उपचारांचा समावेश असेल आणि ते काही औषधे घेत असल्यास तसेच अनोळखी व्यक्तीचे नाव पत्ता शक्य असल्यास विचारून घ्या. रुग्णालयात त्याचा फायदा होईल.  कारण, वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना रुग्णाच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती देतो आणि उपचार सुरू करण्यापूर्वी घ्यावयाच्या खबरदारीची जाणीव करून देतो. हे वाचा - मुतखड्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी उकळलेल्या लिंबू-पाण्याचा असा होतो उपयोग रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यावर - रूग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर रुग्णांनी कोणत्या सूचनांचे पालन करावे लागते याबद्दल बहुतेक रुग्णांना माहिती नसते किंवा ते विसरतात. यासाठी तुम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताना डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांची प्रिंट-आउट घ्या आणि डॉक्टरांकडून ती पूर्णपणे समजून घ्या. म्हणजे काय टाळायचं, औषध कधी घ्यायचं, काय खायचं, पुढच्या वेळी दाखवायला कधी यायचं वगैरे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Medical

    पुढील बातम्या