आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

उत्तम आरोग्य आणि मन प्रसन्न ठेवायचं असेल तर तुम्हाला 'या' गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी.

  • Share this:

मुंबई, 6 मे : स्पर्धात्मक युगामध्ये माणसाचं जगणं अधिक अस्थिर आणि धावपळीचं होऊन गेलं आहे. अशा स्थितीत उत्तम आरोग्य आणि मन प्रसन्न ठेवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी ही घ्यायलाच हवी. त्यातल्या प्रमुख आहेत आहार आणि व्यायाम.

संतुलित आहार - उत्तम आरोग्यासाठी योग्य आणि संतुलित आणि सकस आहार घेणे महत्त्वाचं आहे. कर्बोदके, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, पाणी आणि जीवनसत्त्वं हे अन्नघटकांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यानं त्याचा शरीराला आणि मनालाही फायदा होतो. व्यक्तीचं वय, लिंग, कामाचं स्वरूप आणि विशेष गरजांप्रमाणे प्रत्येकाचा संतुलित आहार हा वेगवेगळा असू शकतो.

'या' कारणानं तणाव कमी होण्याऐवजी वाढतोच

नियमित व्यायाम - शारीरिक कष्टाची कामं, क्रियाशील दिनचर्या आणि मैदानी खेळांमुळे आरोग्य चांगलं राहतं. परंतू बैठ्या कार्यपद्धतीमुळे शारीरिक क्रियांचा समतोल बिघडतो. म्हणून रोज नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

प्रसन्न मन - आहार नेमका आणि ठराविक वेळेतच घ्यावा. सावकाश आणि चावून खावे, भरपूर पाणई प्यावे, अन्न शिजवताना आणि प्रक्रिया करताना योग्य पद्धतींचा अवलंब करावा. विशेष म्हणजे आहार घेताना मन प्रसन्न असावे ही आहारासंदर्भात सर्वसामान्य तत्त्वे आहेत. यासोबतच कामात आलेला थकवा ताण घालवण्यासाठी तुमचा छंद किंवा आवडणाऱ्या गोष्टी करा. ज्यामुळे तुमचं मन पुन्हा प्रसन्न होईल.

वैयक्तिक स्वच्छता - आरोग्य उत्तम राखण्यासाठी वैयक्तिक शारीरिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. शरीराची स्वच्छता ही आपोआप होत रहावी अशी यंत्रणा शरीरात सतत कार्यक्षम आणि कार्यमग्न असते. मलमूत्र विसर्जन, अश्रू, लाळ, त्वचेवरील मृत पेशींचं नष्ट होणं या सगळ्या क्रियांना अडथळा येणार नाही यासाठी शरीराची स्वच्छता आवश्यक असते.

उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर

शांत झोप - उत्तम आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती आणि शांत झोप आवश्यक असते. दिवसभराच्या थकव्यामुळे निर्माण झालेल्या दूषित आणि विषारी पदार्थांची विल्हेवाट लावणं, शरीराची झीज भरून काढणं तसंच शरीराची वाढ तसंच शरीर पु्न्हा ताजंतवानं करणं या सगळ्या गोष्टी शांत झोपेमुळेच शक्य होतात. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने किमान 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक असतं. लहान मुलांनासुद्धा अधिक झोपेची गरज असते.

व्यसनांना ठेवा दूर - धुम्रपान, मद्यपान, मादक द्रव्य शरीराला अपायकारक असतात. या गोष्टींच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे आरोग्य आणि पोषण या दोन्ह गोष्टींवर वाईट परिणाम होतो आणि सामाजित स्वास्थ्यसुद्धा बिघडतं. चहा आणि कॉफी ह्याचं अति प्रमाण सेवन करणं हे व्यसनच आहे ह्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होण्याचा धोका असतो.

First published: June 7, 2019, 7:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading