उन्हाळ्यात काळं मीठ सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. यात सोडियम क्लोराइड, सोडियम सल्फेट, सोडियम बायसल्फेट, सोडियम बायसल्फाइट, आयर्न सल्फाइड, सोडियम सल्फाइड आणि हायड्रोजन सल्फाइड इतके पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात. पदार्थाची चव द्विगुणित करणाऱ्या काळ्या मिठाचे जाणून घ्या फायदे..
काळं मीठात आयर्न आणि मिनरल्स म्हणजेच लोह आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात. यामुळेच काळ्या मिठाला एक वेगळीच चव येते. पोटदुखीच्या समस्येसाठी काळं मीठ उत्तम आहे. रक्तदाबसुद्धा नियंत्रित राहतो आणि शरीरातलं सोडियमचं प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा काळं मीठ फायदेशीर आहे.
आयोडाइज म्हणून पाढऱ्या मिठाची ओळख आहे. यात सोडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे डॉक्टर 'मीठ कमी खा…' असा सल्ला देतात. त्याएवजी काळ्या मिठाचं सेवन हा एक उत्तम पर्याय आहे.
अनेकदा जास्त खाल्ल्याने अजिर्ण किंवा अॅलर्जी होते. काळ्या मिठात असे काही अल्कलाइन गुणतत्तव आहेत, जे पोटात तयार होणारं अॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पेलाभर पाण्यात थोडसं काळं मीठ टाकून ते प्यायल्याने स्नायू शिथिल (मसल्स रिलॅक्स) होतात. पोटॅशियम जास्त असल्यामुळे मसल पेन कमी करण्यासाठी काळं मीठ गुणकारी आहे.