नवी दिल्ली, 27 डिसेंबर : या वर्षी (2021) देखील जगभरात कोरोना (कोविड-19) महामारीची दहशत राहिली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जात होता. अशा परिस्थितीत आपल्याकडील आयुर्वेदिक उपचार आणि पारंपरिक हजारो वर्ष जुन्या प्रिस्क्रिप्शनची जादू सर्वत्र दिसून आली. यावर्षी भारतातील विविध खाद्य पदार्थांनी पाश्चिमात्य देशांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांना सुपर फूडचा दर्जाही मिळू लागला आहे. अशा करोडो पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या गेल्या ज्यात भारतीय आयुर्वेदाच्या खजिन्याचे कौतुक करण्यात आलं. हळद, आवळ्यापासून ते ऑयल पुलिंग, योगासनांना अमेरिका, युरोपात तेजी आली. त्याचप्रमाणे खोबरेल तेल, तूप, नाचणीसह अनेक भारतीय खाद्यपदार्थांनी परदेशात सुपर फूडचा दर्जा मिळवला आहे. 2021 मध्ये अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये आपल्याकडील कोणते खाद्यपदार्थ लोकप्रिय झाले (Desi superfood in 2021) त्याबाबत जाणून घेऊया.
या सुपर फूड्सची मागणी वाढली
आवळा -
HT च्या बातमीनुसार, या वर्षी जगभरात आवळ्याची मागणी प्रचंड वाढली. भारतात आवळ्याचे विशेषत: लोणचे, मुरंबा आणि च्यवनप्राश खाल्ले जाते. परदेशात ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी टॉनिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध म्हणून ओळखले जाऊ लागले. रक्तातील साखर कमी करण्यासाठी आवळ्याचा खप परदेशातही यावेळी वाढला आहे. आवळ्यामध्ये असलेले पॉलिफेनॉल शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते. यामुळे दीर्घकालीन आरोग्य स्थिती सुधारते. आवळा त्याच्या अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीसाठी देखील ओळखला जातो. त्यात कॅन्सरशी लढण्याची क्षमताही आहे.
केळी
केळीचा उपयोग केवळ पचनसंस्था सुधारण्यासाठीच केला जात नाही तर मूड तयार करण्यासाठीही केला जातो. यामध्ये असलेल्या फायबर, पोटॅशियम, फोलेट, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे याला सुपर फूडचा दर्जाही मिळाला आहे. आता परदेशात मूड बूस्टर म्हणून केळीला विशेष ओळख मिळाली आहे.
हे वाचा - Winter Health : थंडीच्या दिवसात सुपरफूड आहे खजूर; हिवाळ्यात यासाठी खाणं आहे गरजेचं
तूप
शतकानुशतके आपल्या देशात तुपाला खूप महत्व आहे. यंदाही परदेशात तुपाला वेगळी ओळख मिळाली आहे. रोटी किंवा डाळीसोबत तूप मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, असा सल्ला अनेक हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे. त्यात व्हिटॅमिन ई असते जे अनेक अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असते.
हळद
शतकानुशतके आपल्या देशात हळदीचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. यामध्ये कर्क्युमिन असते जे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. या कारणास्तव, हळद दाहक-विरोधी बनते जी कर्करोगासारख्या रोगांशी लढण्यासाठीही प्रभावी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.