मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /थंडीत गरमागरम खायला हवं; पण हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे माहिती आहे का?

थंडीत गरमागरम खायला हवं; पण हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे माहिती आहे का?

गरम खाण्याला अनेकांचे प्राधान्य असले तरी गरम खाण्यामुळे आपल्या शरीराला बरेच त्रास होऊ शकतात. गरम खाण्याचा आपल्या शरीराच्या काही भागांवर वाईट परिणाम दिसून येतो.

गरम खाण्याला अनेकांचे प्राधान्य असले तरी गरम खाण्यामुळे आपल्या शरीराला बरेच त्रास होऊ शकतात. गरम खाण्याचा आपल्या शरीराच्या काही भागांवर वाईट परिणाम दिसून येतो.

गरम खाण्याला अनेकांचे प्राधान्य असले तरी गरम खाण्यामुळे आपल्या शरीराला बरेच त्रास होऊ शकतात. गरम खाण्याचा आपल्या शरीराच्या काही भागांवर वाईट परिणाम दिसून येतो.

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : हिवाळ्याचा (Winter) हंगाम सुरू झाला आहे. या ऋतुमध्ये बहुतेक लोकांना गरमा-गरम जेवण (Hot meals) खायला आवडते. बरेच लोक नेहमीच गरम अन्न खातात. आपल्याला लहानपणापासून गरम पदार्थ खायला शिकवले जाते पण त्यामुळे होणारे नुकसान कोणीच सांगत नाही.  गरम खाण्याला अनेकांचे प्राधान्य असले तरी गरम खाण्यामुळे आपल्या शरीराला बरेच त्रास होऊ शकतात.

खरं म्हणजे आपले शरीर लोखंडाचे नसून हाडा-मांसापासून बनलेले आहे. अशा स्थितीत गरम अन्न मांसासोबत शरीराच्या अनेक भागांना इजा करू शकते.  गरम खाण्याचा आपल्या शरीराच्या काही भागांवर वाईट परिणाम दिसून येतो. जास्त गरम अन्न आरोग्यासाठी हानिकारक आहे (Eating hot meals side effect). आज आपण गरम पदार्थ खाल्ल्यामुळे कोणते त्रास होतात याविषयी जाणून घेऊया.

जीभ आणि तोंडातील समस्या

ज्याप्रमाणे गरम पाण्याचा थेंब किंवा वाफ लागल्यावर फोड येऊ शकतात, त्याचप्रमाणे गरम पदार्थ खाल्ल्यास जीभ आणि तोंडाला इजा होऊ शकते. आपली जीभ खूप संवेदनशील आहे.

हे वाचा - Winter Health : थंडीच्या दिवसात सुपरफूड आहे खजूर; हिवाळ्यात यासाठी खाणं आहे गरजेचं

खूप गरम पदार्थ खाल्ल्याने ती पोळू शकते, याचा अनुभव जवळपास सर्वांनाच आलेला असतो. तरीही आपण ती घटना विसरून पुढच्या वेळी खाताना कोणतीही काळजी घेत नाही. यामुळे तोंडातील अवयवांचे नुकसान होते.

पोटाचे त्रास

पोटाची त्वचा आणि विशेषतः आतील त्वचा असे गरम अन्न स्वीकारत नाही. त्यामुळे पोटात दुखणे, कटकटणे आणि उष्णता जाणवते. पोट हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये काही बिघाड झाल्यास समस्या आणखीनच वाढू शकतात.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

दातांचे नुकसान

गरम वस्तू खाल्ल्याने किंवा प्यायल्याने दातांना त्रास होतो. विशेषत: दातांच्या इनॅमलचे नुकसान होते. जेव्हा आपण खात असलेल्या अन्नाच्या तापमानात अचानक बदल होतो, तेव्हा दातातील इनॅमलला तडे जाऊ शकतात आणि हे नुकसान कायमचे असते. इनॅमल खराब झाले की, दात लवकर खराब होऊ लागतात.

First published:

Tags: Food, Lifestyle, Winter, Winter session