दिल्ली,22 जून : बरेच लोक वांगी (Brinjal) पाहून तोडं वाकडं करतात. वांग ही एक अशी भाजी आहे जी नेहमीच बाजारात मिळते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी (Healthy egg plant) वांगं आवडीने खा कारण, बरंच फायदेशीर आहे. वांग्यामध्ये अशी पुष्कळ पोषक तत्त्वं (Health Benefits) आहेत जी इतर कोणत्याही भाजीत सहज सापडत नाहीत.
वांग बर्याच प्रकारे खाता येतं. वांगबटाटा भाजी, वांग्याचे तळलेले काप, वांग्याची भजी, भरीत वांग असे बरेच पदार्थ तयार करता येतात. वांग्यांमध्ये व्हिटॅमीन्स,फिनोलिक्स आणि ऍन्टीऑक्सिडंट्ससारखे गुणधर्म आहेत. जे शरीराला बर्याच त्रासांपासून दूर ठेवतात. एवढच नाही तर, वांगी खाल्ल्याने बरेच आजार दूर राहू शकतात.
चला वांगी खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
(चुकूनही ठेवू नका फ्रीजमध्ये आंबा; ही आहे टिकवण्याची योग्य पद्धत)
वांगी खाण्याचे फायदे
रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते
वांगी खाल्ल्याने प्रतिकारशक्ती (Immunity) बळकट होते. वांग्यात असलेलं व्हिटॅमिन सी (Vitamin C) रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतं. आहारात वांग्याचा समावेश करून आपण बर्याच प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहू शकतो.
(चुकूनही अंड्यांबरोबर खाऊ नका ‘हे’ पदार्थ; होईल अॅलर्जी)
हृदय निरोगी ठेवतं
वांग खाण्याने हृदय निरोगी राहतं. वांग शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतं,ज्यामुळे हृदय निरोगी राहतं. याशिवाय वांगी खाल्ल्यानेही शरीरातील रक्ताभिसरण चांगलं राहतं.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतं
वांगी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. वांग्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असतात. यामुळे,कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
(मुलांच्या निकोप वाढीसाठी करू नका ‘या’ चुका, पालकांनी बदला चुकीच्या सवयी)
एनर्जी वाढते
वांगी एनर्जीचा चांगला स्रोत मानला जातो. शरीरात एनर्जी लेव्हल कमी झाल्याचं जाणवत असेल तर, वांगी खावीत. वांग्याची भाजी खाल्ली तर,दिवसभराचा थकवा दूर होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Vegetables