Home /News /lifestyle /

आता Burger खाता खाताच घटवा वजन; McDonald’s ने शोधला सॉलिड उपाय; पाहा VIDEO

आता Burger खाता खाताच घटवा वजन; McDonald’s ने शोधला सॉलिड उपाय; पाहा VIDEO

McDonalds exercise bike video : मॅकडोनाल्डसमध्ये अशा मशीन लावण्यात आल्या आहेत. ज्यावर बसून तुम्ही खाऊ शकता आणि सोबतच एक्सरसाईझही करू शकता.

    बीजिंग, 23 डिसेंबर : बऱ्याच जणांना पिझ्झा, फ्रेंज फ्राईज, बर्गर असे फास्ट फूड (Fast food) खायला आवडतं. काही जणांचं तर जेवणच हे असतं. पण असे पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणाचाही धोका वाढतो. वजन नियंत्रित राहवं म्हणून काही लोक असे पदार्थ खाण्याच्या इच्छेवरही कंट्रोल करतात. अशाच लोकांसाठी आता मॅकडोनाल्ड्सने (McDonald’s) एक सॉलिड मार्ग शोधला आहे. मॅकडोनाल्ड्सने खाता खाता वजन घटवण्याचा उपाय दिला आहे. मॅकडोनाल्डसमध्ये अशा मशीन लावण्यात आल्या आहेत. ज्यावर बसून तुम्ही खाऊ शकता आणि सोबतच एक्सरसाईझही करू शकता (McDonalds exercise bike video). मॅकडोनाल्ड्स आऊटलेटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.@alvinfoo ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  हा व्हिडीओ शंघाईच्या मॅकडोनाल्ड्सचा आहे. मॅकडोनाल्ड्स शंघाई गेट स्लिम मील, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हे वाचा - 'दररोज एक ग्लास जास्त दूध प्या', पंतप्रधानांचं जनतेला आवाहन; काय आहे कारण पाहा व्हिडीओत पाहू शकता ग्राहक सामान्य टेबलावर बसलेले दिसत नाहीत आहेत. एक टेबलला जोडलेलं एक सायकल सीट आहे. खाता खाता हे ग्राहक सायकलिंगही करत आहेत. म्हणजे वर त्यांचं हात आणि तोंड सुरू आहे. तर खाली पाय. ड्रिंकचा एक घोट ती पिते आणि मग सायकलिंग करू लागते. झी न्यूज हिंदीने फॉक्स न्यूजतच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार चीनमध्ये दोन ठिकाणी मॅकडोनाल्ड्स अशा ग्रीन चार्जिंग बाईकचं एक्सपरिमेंट करत आहेत. सर्वात आधी  ग्वांगडोंग प्रांतातील जियांग वांडा रेस्टॉरंटमध्ये मॅकडोनाल्डने सप्टेंबर 2021 मध्ये आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधी सुरू केली होती. आता शंघाईतील एका रेस्टॉरंटमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा ग्राहकांना आवडेल असा दावा मॅकडोनाल्डसने केला आहे. हे वाचा - शाकाहार करणाऱ्यांनो तुमच्या आहारात 'या' गोष्टी आहेत का? नसेल तर लगेच करा समावेश हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सना ही आयडिया आवडली आहे. तर काही युझर्सनी खाताना एक्सरसाईझ करण्याचे नुकसान सांगितले आहेत. बर्गर खाल्ल्यानंतर मिळणारी निम्मी कॅलरीही यामुळे कमी होणार नाही, असंही काही जणांचं म्हणणं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Health, Lifestyle, Viral, Viral videos, World news

    पुढील बातम्या