दिल्ली, 17 सप्टेंबर : भारतात दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी अनेक तरुणांना व्यायामशाळेत (Gym exercise) जाणे आवडते. आपली शरिरयष्टी (Body shape) पिळदार करण्यासाठी काही तरून हे तासनतास जोरदार व्यायाम (excessive) करतात. त्यामुळे त्यांच्या अंगातून मोठा घाम निघत असतो. अशा वेळी जास्त घाम निघतो आहे, म्हणजे याचा आपल्या शरिराला फायदा होतोय, अशी सर्वसामान्य तरूणांमध्ये भावना असते. परंतु आता व्यायाम करताना अंगातून जास्त घाम निघणे हे आरोग्यासाठी (harmful side effect of excessive exercise) घातक ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गंभीर आजार होण्याचीही शक्यता काही वैद्यकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हा धोका टाळण्यासाठी काय करायला हवं यासाठी आपण काही माहिती घेऊयात. दिल्लीतील सेंट स्टिफन्स रूग्णालयातील फिजियोथेरेपी विभागाच्या सीनियर कन्सल्टंट डॉ. जेकब कुरियन (Dr Jacob Kurien) यांच्या मते, व्यायामशाळेत केवळ एका विशिष्ट ध्येयासाठी व्यायाम करत राहणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या धोक्याबरोबर गाडी चालवतानाही त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. डॉ. कुरियन हे पुढे बोलताना म्हणाले की जास्त वेळ व्यायाम केल्यामुळे आपल्या शरिरातील रक्तदाब वाढतो व रक्तातील साखरेचे प्रमाण घसरते. केवळ Metabolism बुस्ट करून फिगर करा मेन्टेन; ‘या’ गोष्टींची घ्या काळजी त्यामुळे अनेकदा अंगावर मरगळ येण्याची शक्यता असते. त्याचमुळे हायपोग्लीसिमया (hypoglycemia) होण्याचा धोका निर्माण होतो. त्याचबरोबर आपल्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे आपण फार वेळा एखाद्या गोष्टीवर एकाग्रतेने काम करू शकत नाही. त्याचमुळे आपले आरोग्य तर ढासळेतेच परंतु आपल्याला काही विशिष्ट आजार जडण्याचीही शक्यता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.