मुंबई, 24 ऑगस्ट : हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या तरुण अष्टपैलू क्रिकेटपटूचा खेळ तर सर्वांना आवडतोच. पण तो सोशल मीडियावरही तितकात लोकप्रिय आहे. हार्दिक पांड्याच्या एका फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे आणि तो फोटो म्हणजे त्याच्या हातातील घड्याळाचा (Hardik Pandya watch).
हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या काही फोटोंसह मनगटावरील घड्याळाचाही फोटो शेअर केला आहे. माहितीनुसार या घड्याळाची किंमत किमान पाच कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे.
View this post on Instagram
27 वर्षांच्या हार्दिकचे हे फोटो परदेशातल्या ठिकाणचे असून, त्यात तो रोल्स रॉइस कलिनन (Rolls Royce Cullinan) या आलिशान कारमधून फिरताना दिसत आहे. त्याने टँक टॉप, समर हॅट आणि सनग्लासेस परिधान केले आहेत. सर्वांत शेवटच्या फोटोत त्याचं खास घड्याळ दिसतं आहे. घड्याळाचं हे अत्यंत दुर्मिळ मॉडेल आहे. पटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम 5711 (Patek Philippe Nautilus Platinum 5711) असं त्याचं नाव असून, त्यावर हिरव्या रंगाचे 32 baguette-cut एमेराल्ड्सही (Green Emeralds) आहेत.
हे वाचा - 'मला तेंव्हा असं वाटलं की...' बुमराहच्या तिखट स्पेलवर अँडरसनची पहिली प्रतिक्रिया
हे घड्याळ प्लॅटिनम (Platinum) या महागड्या धातूच्या साह्याने तयार करण्यात आलं असून, त्याची केस 40 मिलिमीटरची आहे. घड्याळाची डायल डार्क ग्रे असून, त्यात तास दर्शवण्यासाठीही एमेराल्ड्स (Emeralds) या महागड्या रत्नांचा वापर करण्यात आला आहे. 5711 सीरिजमध्ये काही ऑफ-कॅटलॉग व्हेरिएंट्स असून, ते खास ग्राहकांसाठीच राखीव असतात. डार्क डायलचं घड्याळ हे त्यापैकीच एक. या घड्याळांच्या किमती मॉडेलनुसार बदलतात; मात्र त्याची किमान किंमत पाच कोटी रुपये असेल.
हे वाचा - लॉटरीच! फक्त 86 रुपयात इटलीत मिळणार स्वत:चं घर; पाहा कसं खरेदी करायचं
या घड्याळात डेट विंडो 3 वाजताच्या ठिकाणी असून, 45 तासांचा पॉवर रिझर्व्ह आहे. 5711 ही सीरिजच दुर्मीळ आहे. त्यात एमेराल्डने मढवलेली घड्याळं तर आणखी दुर्मीळ आहेत. कॉमेडियन केव्हिन हार्ट, रॅपर ड्रेक यांच्याकडेही अशी घड्याळं आहेत. पंड्याला घड्याळं आवडतात आणि आपली हौस भागवण्यासाठी त्याने हे महागडं दुर्मीळ घड्याळही खरेदी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, Smartwatch, Sport