हेडिंग्ले, 24 ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात झालेली दुसरी टेस्ट मॅच टीम इंडियानं 151 रननं जिंकली. भारतीय टीमच्या या विजयात जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) मोलाची भूमिका होती. त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये 34 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसंच त्यानंतर त्यानं 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या टेस्टमध्ये बुमराहनं अँडरसनला केलेली बॉलिंग देखील चांगलीच गाजली. इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये बुमराहनं बाऊन्सर टाकून जेम्स अँडरसनला (James Anderson) त्रस्त केले होते. अँडरसननं या सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अँडरसननं एका पोडकास्टला बोलताना सांगितले की, ‘मी बॅटींग करण्यासाठी आलो होतो त्यावेळी बुमराहनं मला शॉर्ट बाऊन्सर आणि यॉर्कर लाईन बॉलिंग केली. मला त्यावेळी असं वाटलं की तो मला आऊट करण्याचा प्रयत्न करत नाही. मी विकेटवर उभा होतो आणि जो रुटला स्ट्राईक देण्याचा माझा प्रयत्न होता. बुमराहनं दोन बॉल यॉर्करही टाकले होते. मी ते कसेबसे वाचवले. मी बॅटींगला आलो तेव्हा पिच स्लो होते. बुमराह त्याच्या क्षमतेप्रमाणे फास्ट बॉलिंग करत नाहीय, असं जो रूटनं मला सांगितलं होतं. मी त्याचा पहिला बॉल खेळला त्याचा वेग 90 मैल प्रति तास होता. तो पाहून मी थक्क झालो. मला माझ्या कारकिर्दीमध्ये यापूर्वी असं कधीही वाटलं नव्हतं,’ अशी कबुली अँडरसननं दिली आहे. ऑस्ट्रेलियन टीममध्ये फूट, ‘या’ बॅट्समनचा कोचला पाठिंबा, सहकाऱ्यांना म्हणाला… अँडरसननं यानंतर पुढे सांगितलं की, ‘बुमराहनं त्या ओव्हरमध्ये 10 ते 12 बॉल टाकले. तो सतत शॉर्ट बॉल टाकत होता. त्यानं दोनदा माझ्या पायावर बॉल टाकला. मी तो अडवलं. काहीही झालं तरी क्रिझवर उभं राहयचं आहे, आणि रूटला स्ट्राईक द्यायची आहे, इतकंच माझ्या मनात होते.’ जेम्स अँडरसननं लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये एकही विकेट मिळाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.