वॉशिंग्टन, 24 सप्टेंबर : आपण कधी पडलो आणि तात्पुरत्या कालावधीसाठी आपला हात किंवा पायाला अशी दुखापत झाली ज्यामुळे आपल्याला हालचाल करणं शक्य होत नाही. त्याचवेळी आपण खचून जातो. विचार करा असे हात-पाय किंवा शरीराचा कोणताही भाग ज्यांच्याकडे बिलकुल नाही त्यांचं काय? असाच एक तरुण ज्याचं निम्मं धड गायब आहे. पण अवघ्या काही सेकंदांनी त्याने आयुष्य बदलून टाकलं आणि यामागे त्याची जिद्द, चिकाटी आणि दृढ निश्चयही आहेच. अमेरिकेतील दिव्यांग अॅथलीटने आपल्या हातांवर चालून वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) केला आहे. सर्वात वेगाने हातावर चालत 20 मीटर अंतर त्याने पार केलं आङे. 23 वर्षांचा जिओन क्लार्कने अवघ्या 4.78 सेकंदात तब्बल 20 मीटर अंतर हातावर चालत पार केलं आहे. क्लार्क एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतो. तो एक लेखकही आहे. आता त्याने हॉल ऑफ फेममध्ये प्रवेश केला आहे. हे वाचा - Appendix चं ऑपरेशन करायला गेली आणि पोटातून निघालं चक्क बाळ; महिलाही झाली शॉक यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसीनच्या माहितीनुसार क्लार्कला जन्मापासूनच पाय नाहीत. त्याला कॉडल रिग्रेशन सिंड्रोम आहे. क्लार्क जन्मापासूनच दिव्यांग आहे. हायस्कूलमध्ये असताना तो एक पहेलवानसुद्धा होता. ओहियोच्या मॅसलिनमधील त्याच हायस्कूल जीममध्ये तो गेला आणि त्याने शिखर गाठलं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, क्लार्कने 4.78 सेकंदात हातावर वेगाने चालण्याचा रेकॉर्ड तोडला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये त्याने हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न केला होता. या आठवड्यात त्याला अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. हे वाचा - रातोरात बदललं नशीब; महिलेला मोफत मिळालं लॉटरी तिकीट; पुढे जे घडलं ते थक्क करणारं क्लार्कने इन्स्टाग्रामवर आपला व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केला. क्लार्क म्हणाला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर बनणं हा खूप विलक्षणीय अनुभव आहे. मुलांना जे बनायचं आहे, ते बनवण्यासाठी त्यांना प्रेरित करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. कुणालाही तुम्ही काय करू शकत नाही हे सांगू नका. दृढ निश्चय असेल तर तुम्हीही कोणतंही ध्येय गाठू शकता, हाच संदेश मला दिव्यांगांना द्यायचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.