मुंबई, 25 डिसेंबर : केस हे प्रत्येकासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतात. कारण केस व्यक्तीचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. परंतु अनेक जणांना केस गळतीचा सामना कारवा लागतो. यामुळे बरेच लोक चिंतेत असतात. तसे पाहिले तर केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण केस गळतीच्या समस्येने त्रस्त असतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक घरगुती उपाय करतात, तर काही जण महागडे उपचार घेतात. परंतु तरीही केस गळती थांबत नाही. केस गळणे हे एक नैसर्गिक चक्र मानले जाते. तज्ज्ञांनुसार सामान्य केस गळती असेल तर काळजी करण्यासारखे काहीही नसते. या लेखात आपण दररोज किती केस गळणे सामान्य असते आणि कधी सावध व्हायला हवे याबाबत जाणून घेणार आहोत.
केसांच्या प्रकारानुसार असा निवडा योग्य शॅम्पू, केसांच्या अर्ध्या समस्या इथेच सुटतीलकिती केस गळणे सामान्य समस्या? रोज गळणारे केसांमुळे अनेक जण खूप चिंतेत असतात. टीव्ही नाईन हिंदीने दिलेल्या रिपोर्टनुसार अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते दररोज 50 ते 100 केस गळणे ही समस्या सामान्य आहे. सामान्य केस गळती हे शरीराचे नैसर्गिक नूतनीकरण चक्र असते. या चक्राच्या पहिल्या टप्प्याला अॅनाजेन म्हणतात आणि त्यात केसांची वाढ होते आणि दुसऱ्या टप्प्याला टेलोजन म्हणतात, यालाच विश्रांतीची अवस्था देखील म्हटले जाते.
कोणाचे केस जास्त प्रमाणात तुटतात? सर्व निरोगी लोकांच्या डोक्यावर सामन्यपणे 80 ते 12 हजार केस असतात. लहान केस असलेल्या लोकांपेक्षा लांब केस असलेल्या लोकांच्या डोक्यावरीर केस गळण्याचे प्रमाण जास्त असते. लांब केस असलेल्या लोकांचे केस अनेकदा धुताना किंवा सेट करताना जास्त प्रमाणात तुटतात.
हिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो! हे घरगुती उपाय नक्की करून बघाकेस गळती केव्हा चिंतेचे कारण असते? तुमचे केस एकत्र आणि मोठ्या प्रमाणात गळत असतील आणि टाळूवर टक्कल पडत असले तर ते चिंतेचे कारण असू शकते. तुमच्या ही केसगळतीची समस्या आरोग्याशी संबंधित असू शकते. अशा प्रकारची केस गळती ही एखाद्या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्यामुळे तुमचे केस एकत्र आणि मोठ्या प्रमाणात गळत असतील तर ती चिंतेची बाब आहे. अशावेळी केवळ केसांतून हात फिरवल्याने देखील मोठ्या प्रमाणात केस गळतात. यामुळे तुमच्या डोक्यावर टक्कल पडू शकते. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.