थंडी सुरू झाली की केस गळणं आणि कोंडा होणं ही अनेकांच्या बाबतीत होणारी कॉमन समस्या आहे. हिवाळ्यात कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. थंडीच्या दिवसात डोक्याची त्वचा कोरडी झाल्यानं कोंड्याची समस्या उद्भवते. यावर वेळीच उपाय केला पाहिजे अन्यथा केसगळती वाढते. कोंडा घालवण्यासाठीचा सगळ्यात स्वस्त, प्रभावी उपाय म्हणजे दही. कोरफडीचे अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीअल गुणधर्म कोंड्यापासून तुमची सुटका करू शकतात. कोरफडीचा गर डोक्याला लावा. लेमनग्रास ऑइलमध्येही रोगप्रतिबंधक आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळं कोंडा कमी होतो. टी ट्री ऑइलमध्ये असलेलं टेरपिनेन-4 सगळ्या कोंड्याला मुळापासून संपवायला मदत करतं. डोक्याच्या त्वचेवर बेकिंग सोडा लावणं हासुद्धा एक उपाय आहे, पण हा वारंवार करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही काही अँटीडँड्रफ शॅम्पूही लावू शकता.