नवी दिल्ली, 26 मार्च : लांब, घनदाट काळे आणि सुंदर केस कोणाला आवडत नाहीत? केस चांगले दिसण्यासाठी लोक केसांसाठी अनेक टिप्स फॉलो करतात. परंतु, अनेक वेळा केसांची विशेष काळजी (Hair Care Routine) आणि विशेष निगा राखूनही वाढ खुंटते आणि केस गळण्याची (Hair Fall) समस्याही सुरू होते. केसांसाठी अनेक महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. केसांची वाढ थांबण्याची काही इतर कारणे जाणून घेऊयात, ज्यामुळे केसांसाठी योग्य प्रॉडक्टस वापरणे तुमच्यासाठी सोपे (Hair Care Tips) होईल.
संप्रेरक असंतुलन
विशेषत: महिलांमध्ये केस तुटण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एंड्रोजन हार्मोन. अनेकदा थायरॉईड, मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान शरीरातील एंड्रोजन हार्मोन असंतुलित होतं. त्यामुळे केस गळणं सुरू होतं आणि केसांची वाढही कमी होते.
जनुकांचा प्रभाव
काही वेळा केस कमी होणे आणि केसांची मंद वाढ होणे हे देखील जनुकांमुळे होते. जर तुमच्या आईचे किंवा वडिलांचे केस लांब नसतील. त्यामुळे तुमच्यावर जीन्सच्या प्रभावामुळे केसांची वाढ कमी होते.
केसांमध्ये पोषक तत्वांची कमतरता
शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक घटकांच्या कमतरतेचाही थेट परिणाम केसांवर होतो. अशा परिस्थितीत प्रथिने आणि व्हिटॅमिनयुक्त आहाराने शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करून तुम्ही केस निरोगी बनवू शकता.
सौंदर्य प्रसाधनांचा प्रभाव
कधी कधी शाम्पू, तेल, हेअर मास्क आणि कंडिशनर सारखी काही केसांचे प्रॉडक्टस आपल्या केसांना मॅच होत नाहीत. त्यामुळे केसांची वाढ थांबते. त्याचबरोबर केसांवर स्टीमिंग आणि स्ट्रेटनर वापरल्यानेही केस गळतात.
थायरॉईड
थायरॉईडच्या रूग्णांमध्ये केसांची समस्या देखील सामान्य आहे. थायरॉईडमुळे शरीरात उपस्थित हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझममुळे केसांची लांबी कमी होऊन केस गळतात.
हे वाचा -
स्ट्रेस घालवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे; संशोधनातूनही आता झालं स्पष्ट
तणावामुळे केस तुटतात
जर तुम्ही जास्त ताण-स्ट्रेस घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. तणावामुळे टेलोजन इफ्लुव्हियम नावाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे डोक्याच्या त्वचेवरील छिद्रांमध्ये नवीन केस येऊ शकत नाहीत आणि केस झपाट्याने गळू लागतात.
हे वाचा -
तगडा बँक बॅलन्स, पैसा-गाडी सगळं होत्याचं नव्हतं होतं; या 3 चुका कंगाल बनवतात
म्हातारपणात केसांची वाढ थांबते
वाढत्या वयाबरोबर केसांशी संबंधित समस्याही वाढू लागतात. वृद्धत्वामुळे केस पांढरे होणे, झपाट्याने तुटणे, केसांची वाढ थांबणे यासारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.