नवी दिल्ली, 25 मार्च : धावपळीच्या आणि अत्यंत स्पर्धात्मक जगात ताण-तणावामुळे होणाऱ्या समस्यांवर बोलणं खूप महत्त्वाचं झालं आहे. तणाव (स्ट्रेस) अनेक गंभीर आजारांचे कारण बनत आहे. स्ट्रेस कमी करणं हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, तणाव, चिंता, नैराश्याचा सामना करण्यासाठी प्रवास करणं खूप प्रभावी ठरू शकतं. 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात याविषयी माहिती दिली (Relieve stress tips) आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, संशोधकांनी निदर्शनास आणून दिलं की, जागतिक महामारी दरम्यान सक्रिय राहणं आव्हानात्मक होतं. विशेषत: तेव्हा बरेच लोक बाहेर पडण्यासही घाबरत होते. काही लोक घरी व्यायाम करण्यास प्राधान्य द्यायचे. मात्र, बाहेर फिरणं, अनेक ठिकाणी भेटी देणं हे स्ट्रेस आणि चांगल्या मानसिक आरोग्यासाठी गरजेचे आहे. ज्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो.
बासेल, स्वित्झर्लंड येथील युनिव्हर्सिटी सायकियाट्रिक क्लिनिकच्या संशोधकांनी, याबाबत माहिती दिली आहे की, लोक जितक्या वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात, फिरतात, तितके त्यांना त्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याबद्दल आरामदायी वाटतं. पूर्वीपासून असलेले मानसिक विकार कमी होत नाहीत. मात्र, मनावर आलेला स्ट्रेस फिरल्यामुळे कमी होतो.
या अभ्यासात 106 रुग्णांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या जसे की, साथीचे आजार, चिंताग्रस्त विकार, मूड डिसऑर्डर, व्यक्तिमत्व विकार आणि ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर या समस्या असणाऱ्यांचे निरीक्षण करण्यात आले. यापैकी काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर काही बाह्यरुग्ण होते, जे घरीच होते. पण त्यांना नियमित थेरपीची गरज होती.
हे वाचा - Vastu बघता-बघता श्रीमंत लोकही होतात कंगाल; वास्तुशास्त्रानुसार या चुका करणं टाळा
या रुग्णांचा आठवडाभर जीपीएस वापरून त्यांच्या प्रवासाचा माहिती संकलित करण्यात आली. त्यांच्याकडून त्यांचा वैयक्तिक आनंद, मानसिक लवचिकता आणि मानसिक आरोग्य समस्यांबद्दल प्रश्नावली देखील भरली.
हे वाचा - सकाळी नीट पोट साफ होत नाही? कोणत्याही औषधांपेक्षा ही फळं खा, चांगला परिणाम दिसेल
जेव्हा संशोधकांनी या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांशी जीपीएस माहितीशी जोडून पाहिले. त्यावेळी त्यांना असे आढळले की, प्रवास केल्याने मनाला आराम मिळतो, हे स्ट्रेसच्या तीव्र भावनांशी संबंधित आहे, तथापि, मानसिक आरोग्य विकारांची लक्षणे साधारणपणे सारखीच राहिली. मानसिक आजारात रुग्णाच्या दैनंदिन गोष्टींवर समान परिणाम होत नाही, असे त्यांना दिसून आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Stress