जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तगडा बँक बॅलन्स, पैसा-गाडी सगळं होत्याचं नव्हतं होतं; या 3 चुका माणसाला पुन्हा कंगाल बनवतात

तगडा बँक बॅलन्स, पैसा-गाडी सगळं होत्याचं नव्हतं होतं; या 3 चुका माणसाला पुन्हा कंगाल बनवतात

iifl wealth hurun india rich list 2021

iifl wealth hurun india rich list 2021

व्यक्तीची योग्य वागणूक (Behavior) आणि सवयी (Habits) खूप महत्त्वाच्या असतात. या दोन गोष्टींमध्ये गडबड झाली, तर यश मिळाल्यावरसुद्धा माणूस पुन्हा अपयशाच्या खाईत जाऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 मार्च : जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, क्षमता यासोबतच इतर काही गोष्टींची गरज आहे. यामध्ये व्यक्तीची योग्य वागणूक (Behavior) आणि सवयी (Habits) खूप महत्त्वाच्या असतात. या दोन गोष्टींमध्ये गडबड झाली, तर यश मिळाल्यावरसुद्धा माणूस पुन्हा अपयशाच्या खाईत जाऊ शकतो. आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीला यश हवे आहे, मिळालेल्या गोष्टी टिकवून ठेवायच्या आहेत त्यानं अत्यंत सावधपणे वागले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार काही चुका टाळल्या पाहिजेत. अन्यथा आपण यशस्वी होऊनही आपले आयुष्य उद्ध्वस्त होऊ (Lifestyle tips) शकतं. कधीही चुकीच्या, अनैतिक गोष्टी करू नका : ज्या व्यक्तीला पैसा, यश, सुख हवे आहे त्याने कधीही अनैतिक गोष्टी करू नयेत. चुकीच्या मार्गाने धन मिळवणं सोपं असतं, पण त्यामुळे आपली प्रतिमा डागाळते आणि एखाद्या दिवशी खूप मोठा फटका बसतो. मिळालेलं धन-दौलत आणि समाजातील किंमत नाहीशी होते. चुकीच्या सवयी चुकीची संगत व्यक्तीला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात, म्हणून नेहमी त्यांच्यापासून दूर रहा. हे वाचा -  Vastu बघता-बघता श्रीमंत लोकही होतात कंगाल; वास्तुशास्त्रानुसार या चुका करणं टाळा बचत करा: चांगले शिक्षण, आरोग्य आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, दीर्घकाळ अनावश्यकपणे पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूसही गरीब होऊ शकतो. त्यामुळे वाईट काळासाठी बचत करण्याचे सुनिश्चित करा. अन्यथा, उधळपट्टी तुमचे चांगले जीवन नष्ट करू शकते. उधळपट्टीने कंगाल झालेल्यांची समाजात अनेक उदाहरणे आहेत. हे वाचा -  सकाळी नीट पोट साफ होत नाही? कोणत्याही औषधांपेक्षा ही फळं खा, चांगला परिणाम दिसेल वेळेचे महत्त्व समजून घ्या : वेळ अमूल्य आहे. वेळेचे महत्त्व समजून घ्या, वेळ वाया घालवू नका. ज्या व्यक्तीला यश मिळवायचे आहे त्याने आपल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. वेळेच्या वापराबाबत जितके दक्ष असले पाहिजे तितकेच तो आपल्या संपत्तीचे रक्षण करतो. (सूचना: येथे दिलेली माहिती जनजागृतीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात